दिवगंत अभिनेत्री मीना कुमारी यांना गुगलचे डूडलद्वारे अभिवादन

ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूडची ‘ट्रजेडी क्वीन’ अर्थात दिवगंत अभिनेत्री मीना कुमारी यांच्या 85व्या जयंतीनिमित्त गुगलने आपल्या होमपेजवर डूडलद्वारे मीना कुमारी यांना अभिवादन केले आहे. गूगलच्या डूडलद्वारे नेहमीच दिग्गजांच्या आठवणींना उजाळा दिला जातो.
1 ऑगस्ट 1932 रोची मीना कुमारी यांचा जन्म झाला होता. महजबीन बेगम असे मीना पुमारी यांचे मुळ नाव. 30 वर्षांच्या सिने-कारकीर्दीत मीना कुमारी यांनी 90हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. त्यांचे अनेक सिनेमे आजही ‘क्लासिक’म्हणून गाणले जातात.मीना कुमारी यांच्या वाटय़ाला अनेक शोकात्म आल्या.त्यांचे सिनेमे पाहताना प्रेक्षकही रडत असत, असे सांगितले जाते.म्हणूनच मीना कुमारी यांना ‘ट्रजेडी क्वीन’ असे म्हटले जात होते.
Related posts:
Posted in: माहिती / तंत्रज्ञान