|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » पालघरमध्ये बस अपघातात 11 प्रवासी जखमी

पालघरमध्ये बस अपघातात 11 प्रवासी जखमी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पालघर जिह्यातील सफाळेजवळ आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 11 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टेंभी खोडावे-सफाळे एसटी बसला आज सकाळी आठच्या सुमारास मांजुर्ली येथे भीषण अपघात झाला. बसमधील अकरा प्रवासी जखमी झाले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

Related posts: