|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » तैवान 6.6 अब्ज डॉलरची भारतात गुंतवणूक करणार

तैवान 6.6 अब्ज डॉलरची भारतात गुंतवणूक करणार 

पेट्रोकेमिक्लस प्रकल्प उभारणार

नवी दिल्ली

 तैवानकडून येत्या काळात 6.6 अब्ज डॉलरची भारतात गुंतवणूक करण्यात येणार आहे. हि गुंतवणूक पेट्रोकेमिकल्स प्रकल्प उभारण्याकता करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. ओडीसा येथे तेल साठवण्यासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून हे काम इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण तेल मंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिले आहे.

हा प्रकल्प उभारण्यात आल्या नंतर तेल शुद्धीकरण करण्यात येऊन यात एका वर्षाला 15 दशलक्ष तेल शुद्धीकरण करण्यात येणार असल्याची क्षमता या प्रकल्पामध्ये निर्माण करण्यात येणार आहे. पर्यवरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून यांची रचना करण्यात येणार आहे. अशा मुद्यांवर चर्चा यावेळी करण्यात आली. ही गुंतवणुक भारतासाठी योग्य असल्याचे मत या दरम्यान अधिकाऱयांकडून मांडण्यात आले. 

भारतात तैवानकडून करण्यात गुंतवणूक आणि नवीन योजना यावर चर्चा करण्यात घडवून आणली. तैवानमधील सीपीसी या तेल क्षेत्राशी कार्यरत असणाऱया कंपनीशी तैवान अध्यक्ष भारतीय अधिकारी यांच्यात भविष्यातील वाटचाल सकारात्मक करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ट्वीट करुन प्रधान यांनी या गुंतवणूकीला पुष्टी दिली.