|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » महिंद्राकडून नवीन कारचे नामकरण ‘माराझो’

महिंद्राकडून नवीन कारचे नामकरण ‘माराझो’ 

नवी दिल्ली

 महिंद्रा कंपनीकडून लवकरच सादर करण्यात येणाऱया मल्टीपर्पज कारचे नामकरण करण्यात आले आहे. या कारचे नाव ‘माराझो’ असे ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आहे. आतापर्यत या कारचे कोड नाव ‘यु 321’ देण्यात आले होते. परंतु स्पॅनिश शब्दापासून तयार झालेल्या माराझो याचा अर्थ शार्क असा होतो. तर कारचे नामकरण तसेच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली आहे.

महिंदा कंपनीकडून उत्पादनाची जागतिक स्तरावर एक ओळख निर्माण करण्यात आलेली आहे. यात गुणवता, तंत्रज्ञान, सुरक्षा, याचा विचार करून या कारचे उत्पादन करण्यात येत आहे. कंपनीने नाशिक या ठिकाणी असणाऱया प्रकल्पामधून  या कारचे उत्पादन करण्यात येत असून या कारचे अधिकृत लाँचिंग सप्टेंबर तिमाहीत करण्यात येणार असून 2019 वर्षाच्या अगोदर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

शार्क डिझाईन

या कारचे उत्पादन करत असताना महिंद्रा डिझाईन स्टूडिओ आणि इटालियन डिझाईन हाऊस यांच्या संयुक्त भागीदारीने काम केले आहे. या माराझो कारकडे बोल्ड आणि न्यू आवृत्ती म्हणून बघण्यात येणार आहे. जागतिक पातळीवरचे उत्पादन म्हणूनही याला विकसित करण्यात येणार आहे. कारण यामध्ये अमेरिकेतील टेक्निकल सेंटर व महिंद्राचे चेन्नई संशोधन केंद्र या ठिकाणी या कारचे संशोधन करण्यात आले होते.

Related posts: