|Sunday, November 18, 2018
You are here: Home » उद्योग » रेपो दर वाढल्याचा नकारात्मक परिणाम

रेपो दर वाढल्याचा नकारात्मक परिणाम 

निफ्टी 11,350 खाली , सेन्सेक्स 85 अंकावर स्थिरावला

प्रतिनिधी / मुंबई

शेअर बाजारात सलग असलेली तेजी भारततीय रिर्झव्ह बँकेकडून रेपो दरात 0.25 टक्क्य़ांची वाढ करण्यात आल्यानंतर दिवसभरातील व्यवहारावर यांचा  परिणात दिसून आला सकाळच्या सत्रातील तेजी बाजाराने गमावली आणि बाजारात दबावाच्या वातावरणासह बाजारा बंद झाला.

बुधवारी बाजारात निफ्टीने 11,390.55 वर वधारत नवीन उची गाठली तर सेन्सेक्सने 37,711.9 वर पोहोचण्यात कामयाम झाला. परंतु तेजीचे वातावरण कायम राहण्यात बाजराला यश मिळाले नाही. शेवटच्या क्षणात सेन्सेक्स 37,525 वर जात बंद झाला तर निफ्टी 11,350 वरुन घसरण नोंदवण्यात आली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या समभागात थोडय़ा प्रमाणात चांगले वातावरण दिसून आले. बीएसईचा मिडकॅपचा निर्देशांकात 025 टक्क्यांची उसळी घेत बंद झाला. दुसरीकडे निफ्टीचा मिडकॅपच्या निर्देशांकात 100 अंकानी म्हणजेच 0.15 टक्के वाढ दर्शवण्यात आली. यावेळी बीएसईचा निर्देशांक 0.25 टक्क्य़ांनी वधारत बंद झाला.

बीएसईच्या मुख्य 30 समभागातील मुख्य निर्देशांकातील  सेन्सेक्स आणि निफ्टीत काही प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली. बाजारात बुधवारी बँकिंग, ऑटो,धातू या कंपन्याच्या समभागाच्या खरेदीवर दबावाचे वातावरण दिसून आले. तर बँक निफ्टीत 0.6 टवक्यांची घसरण नोंदवत बंद झाला. तर एफएमसीजी, आयटी, औषध, पीएसयु बँक आणि तेल व गॅस या कंपन्याच्या समभागात खरेदी झाल्याचे दिसून आले.

दिग्गज शेअर्समध्ये हिंडाल्को, मारुती सुझुकी, आयशर मोर्ट्स, वेंदान्ता, आयसीआयसीआय बँक , टाटा स्टिल आणि भारती एअरटेल यांच्या समभागात 2.5 ते 1.7 टक्क्य़ांची घसरण होत बंद झाला. कोल इंडिया ल्युपीन, भारती इन्फ्राटेल. डॉ. रेड्डीज लॅब, आयओसी, सन फार्मा आणि पॉवर ग्रीड या कंपन्याचा समभाग 3.7 ते 1 टक्के वधारत बाजार बंद झाला. 

मिडकॅप समभागात आदित्य बिर्ला, आयडीबीआय बँक , अशोक लेलॅन्ड, यांचे समभाग 9.5 ते 4.5 टक्क्य़ांची उसळी घेत बंद झाला. तर रिलायन्स इन्फ्रा, इमामी, रिलायन्स पॉवर आणि कॅस्ट्रोल यांचे समभाग 4.5 ते 3.5 टक्क्य़ांवर स्थिर झालेत.

Related posts: