|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » ‘वंटास’च्या निर्मात्याला बेडय़ा;9किलो सोने घेऊन लंपास होण्याचा प्रयत्न

‘वंटास’च्या निर्मात्याला बेडय़ा;9किलो सोने घेऊन लंपास होण्याचा प्रयत्न 

ऑनलाईन टीम / मुंबई :

वंटासचित्रपटातून झालेल्या नुकसानीमुळे चित्रपटाचा निर्माता अमोल लवटे याने सोने व्यापाऱयाचे 9 किलो सोने घेऊन देशाबाहेर पळ काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. मात्र, तो फरार होण्याआगोदरच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोलला बेडय़ा ठोकल्या आहेत.

काळबादेवी परिसरात अमोल हा भागीदारीतून सोने गाळण्याचा व्यवसाय करतो. त्याला 21 जुलैला एका व्यापाऱयानं सोने गाळण्यासाठी दिले. मात्र, ते सोने गाळण्याऐवजी सोने घेऊनच पळण्याचा प्लॅन केला. त्यावेळी व्यापाऱयाने त्याच्या नोकराला पाठवले. मात्र, त्याला झोप लागल्याने संधीचा फायदा घेत अमोल लवटे ते सोने घेऊन साथीदारांसह फरार झाला. संदीप लवटे, आप्पा घेरडे आणि पोपट आटपाडकर असे अमोल लवटेच्या इतर साथीदारांची नावे आहेत. त्यानंतर व्यापाऱयाने अमोल लवटेविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी सापळा रचून मानखुर्द टी जंक्शन येथून अमोलला अटक केली आहे.