|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » 2018मध्ये बेकारीचा दर 3.5 टक्के राहणार : आयएलओ

2018मध्ये बेकारीचा दर 3.5 टक्के राहणार : आयएलओ 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

चालू वर्षामध्ये भारतात बेकारीचा दर 3.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन (आयएलओ) यांनी सादर केलेल्या एका अहवालामधून मांडला आहे. तर दुसरीकडे चीन मधील बेकारीची असलेली टक्केवारी 4.7 वरुन 4.8 टक्के इतका वाढणार असल्याचा अंदाज यादरम्यान सादर केला आहे.

भारतात बेकारीच्या टक्क्यांत कमी प्रमाण असले तरी जवळपास 77 टक्के रोजगार असुरक्षित असल्याचे अनुमान याचवेळी मांडण्यात आले आहे. या असुरक्षेच प्रमाण परदेशी देशामध्ये कमी आसल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये 33 टक्केच रोजगार असुरक्षित श्रेणीमध्ये राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आशिया आणि प्रशांत महासागराच्या क्षेत्रात आर्थिक विकासाचा दर 5.5 टक्के राहणार असल्याचे ‘द वर्ल्ड एम्पलॉयमेन्ट ऍण्ड सोशल आऊटलूक-टेड्रर्स 2018’ यांनी सादर केलेल्या अहवालातून सांगण्यात आले आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था दक्षिण आशियातील आर्थिक विकास वाढवण्यास चालना देणार असून 2018 मध्ये जीडीपी 7.4 टक्के वाढण्याचा अंदाज आहे. तर हाच विकास मागील वर्षात 6.7 टक्के इतका राहिला होता. असेही या अहवालामधून मांडले आहे.

बॉक्स असंघटीत क्षेत्र

भारत, बांगलादेश, कंबाशडीया आणि नेपाळ असंघटीत क्षेत्रात जवळपास 90 टक्के कामगार आहेत. याचे मुख्य कारण या देशामध्ये कृषी बरोबर बांधकाम आणि होलसेल रिटेल व्यापाराचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात संघटीत असल्याचे दिसून येते.

 

Related posts: