|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » पियाजीओ इंडियाकडून व्हेस्पा 125 लाँचिग

पियाजीओ इंडियाकडून व्हेस्पा 125 लाँचिग 

नवी दिल्ली :

पियाजीओ इंडियाने व्हेस्पा नोटो 125 स्पेशल आवृत्तीच्या स्कूटरचे भारतात लाँचिग करण्यात आले आहे. या स्कूटरची सुरुवातीची एक्स शोअरुम किमत 68 हजार 645 रुपये ठेवण्यात आली आहे. अशी माहिती कंपनीकडून स्कूटर लाँचिग दरम्यान देण्यात आली आहे.

व्हेस्पा स्कूटरला कंपनीच्या विविध विक्रीच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून यांची खरेदी करत असताना 8 हजार 999 रुपयांची रक्कम भरुन या स्कूटरची खरेदी करता येणार असल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले आहे.

ग्राहकांसाठी आनंदाची बाब म्हणजे या स्पेशल आवृत्तीचे बाजारात सादरीकरण करत असताना व्हस्पा व्हीएक्सएल या मॉडेलपेक्षा 4 हजार स्वस्त किमत लागू करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. भारतात लाँचकरण्यात आलेल्या या स्कूटरमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून बाजारातील संशोधन करण्यात आल्याच्या नंतर या गाडीला लाँच करण्यात आले असल्याचे यावेळी सांगयात आले आहे.

अनेक नवीन बदलासह या गाडीला बदल करुन बाजारात उतरल्यामुळे ग्राहकांच्या विश्वासास आपण प्रात्र होणार असल्याचा दावा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयाकडून करण्यात आली.

 

 

 

Related posts: