|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » लवकरच ‘व्हाट्सऍप फॉर बिजनेस’

लवकरच ‘व्हाट्सऍप फॉर बिजनेस’ 

वृत्तसंस्था /बेंगळूर :

भारतात मोठय़ा कंपन्यामध्ये लवकरच कर आणि उत्पादन सादर करण्याच्या कामासाठी व्हाट्सऍप नवीन ऍपची निर्मीती करणार आहे. त्यामुळे येत्या काळात कंपनतील कामासाठी न्यू फिचर्स वापरात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या ऍपला ‘व्हाटसऍप फॉर बिजनेस’ या नावानी तयार करण्यात येणार आहे.

कंपनी या ऍपच्या माध्यमातून थेट ग्राहकांशी संवाद साधणारी सुविधा देणार आहे. या सुविधेची सुरुवात देशातील ऑनलाईन ट्रव्हल एजन्सीजसाठी मेक माय ट्रीप, साफ्टवअर तयार करण्यात येणार आहे. औषध कंपन्या आदी  व्यवसायांशी निगडीत असलेल्या या ऍपची सुविधा देण्यास सुरुवातीच्या काळात वापर करता येणार आहे.

मागील वर्षात काही लहान कंपन्या ग्राहकांना संपर्क करण्यासाठी व्हाट्सऍपचा उपयोग केला जात असल्याचे दिसून आले. याचे व्यवस्थापन करुन ऍपची निर्मीती केल्यास त्याचा फायदा भारतातील उद्योग क्षेत्राला होणार असल्याचा विश्वास व्हाट्सऍपचे सीईओ मॅथ्यु आयदेमा यांनी व्यक्त केला आहे.