|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दूध पॅकिंगच्या मशिनरीला चढतोय गंज

दूध पॅकिंगच्या मशिनरीला चढतोय गंज 

प्रतिनिधी /सोलापूर :

दूध संकलित करणे, शुद्धीकरण करणे आणि पॅकिंग करुन ग्राहकांना विकणे यात आपला स्वतंत्र दबदबा असलेल्या शासकीय दूध योजना आणि दुग्धशाळा मोडकळीला आल्या असून दुधाचे पॅकिंग करण्यासाठी शासनाने कोटय़वधी रुपयांच्या मशिनरी खरेदी केल्या. परंतु दूध पुरवठा शासकीय योजनेऐवजी खासगी आणि सहकारी दूध संस्थांकडेच अधिक होत असल्यामुळे या संस्थाच गबर होत चालल्या आहेत. पर्यायाने दूध पॅकिंगसाठी खरेदी करण्यात आलेल्या मशिनरीला गंज चढू लागला आहे. हे चित्र सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिह्यात पहायला मिळत आहे.

   एकेकाळी दररोज 1 लाख लिटर दुधाचे पॅकिंग करून विक्री करणाऱया शासकीय दुग्ध व्यवसायाच्या मशिनरी सध्या धुळखात आहेत. शासनाने कोटय़वधीच्या मशिनरी दुध संकलन व पॅकिंगसाठी बसविल्या, मात्र या जिल्हा सहकारी दूध संघांनी शासनाला दुध पुरवठा करणे बंद केल्यामुळे या मशिनरी तशाच पडून आहेत. मशिनरी धुळखात पडण्याचे विदारक चित्र पश्चिम महाराष्ट्रात आहे. मुंबई, कोकण मराठवाडा या भागात शासनाच्या मशिनरी चालू असून इतर जिह्यात मात्र या बंद मशिनरी सांभाळत बसण्याची वेळ आली आहे.