|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार

गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार 

प्रतिनिधी /सातारा :

सांगली जिल्हय़ातील तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पतीला कारमध्ये कोंडून आठ नराधमांनी बलात्कार केला. माणुसकीला काळीमा फासणाऱया या घटनेमुळे सांगली जिल्हय़ासह महाराष्ट्रात संतापाचे पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुकुंद माने, सागर, विनोद (पूर्ण नाव माहित नाही) या तिघांना ताब्यात घेवून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाने याचा तीव्र शब्दात निषेध  केला असून आरोपींवर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक  करावी, अशी मागणी केली आहे.

    दिल्लीतील निर्भया, कोपर्डीच्या भगिनीवरील बलात्काराच्या घटनांनी सारा देश पेटून उठला होता. परंतु आजही मानवी वासना किती निच पातळीवर जावू शकते याचा नमुनाच तुरची फाटा येथे आठ हैवानांनी दाखवून दिला. मी आठ महिन्यांची गरोदर आहे असा टाहो महिला फोडत असतानाही वासनेने पिसाळलेल्या या नराधमांनी माणुसकीला कमरेला गुंडाळली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, तासगाव तालुक्यातील तुरची फाटा येथे माण तालुक्यातील एका विवाहित आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर तिच्या पतीला कारमध्ये डांबून ठेवून आठ जणांनी बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी तासगाव पोलिसांत पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद व अनोळखी चौघे (पूर्ण नावे, पत्ता नाहीत) अशी त्यांची नावे आहेत.