|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माण नदीवरील कठडय़ाचे काम युध्दपातळीवर सुरू

माण नदीवरील कठडय़ाचे काम युध्दपातळीवर सुरू 

वार्ताहर /म्हसवड :

दहिवडी (ता. माण) येथील नदीवरील तुटलेल्या संरक्षक कठडय़ाला दिलेला कळकांचा आधार काढून त्या जागी सिमेंटचे भक्कम खांब उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ‘तरूण भारत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यांनतर लगेचच या कामाला सुरुवात केल्याने ‘तरूण भारत’चे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. 

वाहतुकीला धोकादायक कठडे

नगर-सांगली राज्यमार्गावर दहिवडी येथे माण नदीवर असलेल्या या पुलाचे संरक्षक कठडे अपघातामुळे तुटले होते.वाहतुकीला धोकादायक असणारे हे कठडे दुरुस्त करण्याची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने कळकाचा आधार दिला होता. या पुलाचा परिसर अपघातप्रवण क्षेत्र असल्याने काळजी घेण्याची गरज असतानाही अनेक दिवसांपासून संरक्षक कठडे म्हणून कळकांवरच दिलेला जुजबी भार अधिकच धोक्याचा बनला होता.

पुलावरील धोका होणार कमी

याबाबतचे वृत्त ‘तरूण भारत’मध्ये 25 जुलै रोजी प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दाखल घेऊन बांधकाम विभागाने लगेचच या संरक्षक कठडय़ाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुलावरील धोका कमी होणार असून लोकांचा जीव वाचणार आहे. यामुळे  ’दै तरूण भारत’ चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.