|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » माण तालुक्यात ‘आकाड’ सेलिब्रेशनची धूम

माण तालुक्यात ‘आकाड’ सेलिब्रेशनची धूम 

वार्ताहर /वरकूटे-मलवडी :

माण तालूक्यातील दहिवडी व म्हसवड शहरासह प्रत्येक गावामध्ये आषाढनिमित्त देवी देवताच्या नैवेद्यासाठी कोंबडा खरेदीवर अधिक भरदेण्यात येत असून म्हसवड येथील आठवडा बुधवारच्या बाजारात गावरान कोंबडा खरेदीसाठी खवय्यांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. कोंबडीपेक्षा कोंबडय़ाला जास्त मागणी असल्यामुळे अनेक खवैय्यांनी देशी कोंबडय़ाची चक्क 400 ते 500 रूपये दराने खरेदी-विक्री झाली. 

म्हसवड येथे दर बुधवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात आसपासच्या खेडेगावातील शेतकरी व काही कूक्कटपालन करणारे युवक आपल्या गावरान कोंबडय़ा विक्रीसाठी घेऊन आले होते. चांगला दर मिळेल या आशेने शेतकरी व पोल्ट्रीवाले गावरान कोंबडय़ासह गिरीराज, आर. आय. आर प्रजातींच्या कोंबडय़ा व कोंबडे बाजारात विक्रीसाठी घेऊन आले होते. 

गटारी अमावस्या 10 रोजी

येत्या 10 ते 12 दिवसाने श्रावण महिना सुरू होत असल्याने खवैय्यांनी कोंबडी खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दी केली होती. मात्र ‘आकाड’ साजरा करण्यासाठी खवय्यांनी कोंबडी पेक्षा कोंबडय़ाला पंसती दिल्याचे दिसून आले. बाजारात कोंबडीच्या तुलनेत कोंबडय़ांची संख्या कमी असल्याने गावरान कोंबडय़ांची चढय़ा दराने विक्री झाली. एरवी 300 ते 350 रूपयाला मिळणारा कोंबडा खवैय्यांनी चक्क 500 रूपये देत खरेदी केला. कोंबडीला 200 ते 250 रूपये दर मिळाला यामध्ये दलालाकडून देखील कोंबडय़ाची खरेदी होत असल्याने दर वाढल्याचे दिसून येत आहे. गटारी अमावस्या 10 ऑगस्ट रोजी असून त्यानंतर श्रावण महिना पाळणाऱया खवय्यांना अजून शूक्रवार, रविवार, मंगळवार असे अजून तीन वारी आकाड सेलिब्रेट करता येणार आहे.

Related posts: