|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » रेपो दर वाढीने दुसऱया दिवशीही घसरण

रेपो दर वाढीने दुसऱया दिवशीही घसरण 

वृत्तसंस्था /मुंबई :

मागील  दोन दिवसाची  राहिलेली तेजी गुरुवारी दिसून आली नाही. दिवसभरातील व्यवहारात विदेशी बाजारात खराब वातावरणामुळे विक्रीत दबावाचे वातावरण दिसून आले. यामुळे सेन्सेक्समध्ये 350 अंकाहून जादा घसरण झाली तर निफ्टीत 11,250   घसरण दिसून आली.

बँकेच्या समभागात बाजारात खरेदी वातावरण दिसून आले यात बँक निफ्टीत 250 अंकावर स्थिरावला होता. दिग्गज कंपन्याच्या समभागात भारती एअरटेल, मारुती सुझुकी, पीएनबी, कोटक महिंद्रा बँक यांच्या समभागात जादा घसरण दिसून आली. तर ल्युपीन, डीआरएल, पॉवरग्रीड आणि एचसीएल या कंपन्याचे समभाग वधारल्याचे चित्र बाजारात होते.

दिग्गज शअर्समध्ये शांत वातावरण राहील्याने स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभाग ठप्प राहीला होता. यात मिडकॅपचा निर्देशाक 14 अंकानी म्हणजे 0.09 टक्कय़ाची किरकोळ वाढ होत. 16,057.60 अंकावर  पोहोचला बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशाक 0.07 टक्क्याची थोडी वाढ होत 16,639.81 वर जात बंद झाला.

औषध आणि धातू  कंपन्या सोडून इतर क्षेत्रात काहीशे विक्रीवर दबावाचे वातावरण राहीले होते. बीएसईमध्ये ऑईल ऍण्ड गॅस याच्या निर्देशाकातील समभाग 0.12 टक्केची तुट दिसून आली. तर टेलिकॉमचा निर्देशाकाचा समभागात 1.47 टक्क्याची घसरण दिसून आली. तर निफ्टित ऑटोचा समभाग 1.4 टक्के, एफएमसीजी निर्देशाकात 0.32 टक्के आणि आयटी 0.86 टक्के तर रियल्टीचा समभागात 1.66 टक्के अशी घसरणीची नोंदणी करण्यात आली आहे.

बीएसईच्या 30 शेअर्समध्ये मुख्य निर्देशाकातील 256 अंकानी म्हणजे 0.95 टक्कय़ाची घसरण नोंद करत 37,165.16 स्तरावर आणि एनएसईचा निर्देशाकातील 50 कंपन्याच्या समभागात 101.50 अंकानी 0.89 टक्के कमजोर होत 11,244.70 वर  बंद झाला. एकूण बजारातील वातावरण उदासिन राहिले होते.

 

 

 

 

Related posts: