|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » आंदोलने आणि मोर्चे निघूनही जनतेचा विश्वास भाजपावर-मुख्यमंत्री

आंदोलने आणि मोर्चे निघूनही जनतेचा विश्वास भाजपावर-मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील आंदोलने आणि मार्चेनिघूनही जनतेचा भाजपावरील विश्वास कायम असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील यशानंतर दिली आहे. सध्या राज्यात सर्वत्र आंदोवने आणि मोर्चे निघत आहेत. मात्र तरीही जनतेचा भाजपा आणि राज्य सरकारवरील विश्वास कमी झालेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जळगाव आणि सांगली महापालिकेत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सांगली आणि जळगावातील जनतेने भाजपावर विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल आम्ही तेथील जनतेचे आभारी आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मराठा मोर्चावरही भाष्य केले. ‘सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत. मात्र हा प्रश्न आता निर्माण झालेला नाही, हे जनतेला माहित आहे. हा प्रश्न 40 ते 50 वर्ष जुना आहे, याची कल्पना जनतेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपा सरकार सोडवेल, असा विश्वास राज्यातील जनतेला आहे,’ असे फडणवीस म्हणाले. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास आणि विश्वासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला आहे. जनतेने दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

Related posts: