|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » म्हशीच्या पोटात प्लास्टिकसह अखाद्यजनकाचा 40 किलो साठा

म्हशीच्या पोटात प्लास्टिकसह अखाद्यजनकाचा 40 किलो साठा 

वार्ताहर / देवगड:

वाघोटन येथील मनोज पुनाजी गुरव यांच्या मालकीच्या म्हशीच्या पोटातून प्लास्टिक व इतर अखाद्यजनक वस्तूंचा सुमारे 40 किलोचा साठा शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढून तिला जीवदान देण्यात आले. ही शस्त्रक्रिया पशुधन विकास अधिकारी माधव घोगरे यांनी केली.

गुरव यांच्या मालकीच्या म्हशीला गेले पंधरा दिवस पोटफुगी व अपचनाचा त्रास जाणवू लागला होता. म्हैस चारा, पाणी खात नसल्यामुळे रवंथ प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे म्हशीची तब्येत खालावली होती. गुरव यांनी डॉ. घोगरे यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर घोगरे यांनी म्हशीची तपासणी करुन सहाय्यक डॉ. बागुल, डॉ. गाडेकर, परिचर अशोक गवसे यांच्या मदतीने म्हशीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. सुमारे तीन तासाच्या कालावधीत रुमिनाटॉमी शस्त्रक्रियेद्वारे म्हशीच्या पोटातून प्लास्टिक व इतर अखाद्यजनक घटकाचा सुमारे 40 किलो साठा बाहेर काढला. यात प्लास्टिक पिशव्या, दाव्याचे व कपडय़ाचे तुकडेही होते.