|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लग्न मंडपातून नव वधु-वर थेट मराठा आंदोलनाच्या मंडपात

लग्न मंडपातून नव वधु-वर थेट मराठा आंदोलनाच्या मंडपात 

अनिल कामीरकर / गारगोटी

 अक्षता पडल्या…नव वधू-वरांने जे÷ांचे आशिर्वाद घेऊन थेट मराठा आंदोलनाचा मंडप गाठला व क्षणार्धात एक मराठा लाख मराठा, आरक्षण मिळालेच पाहिजेच्या घोषणा देऊन मंडप दणाणून सोडले. अचानक झालेल्या या घडामोडींमुळे आंदोलन कर्त्यांमध्ये एक नवचैतन्य पसरले आणि मग सगळय़ांनीच घोषणा देऊन मंडप दणाणून सोडला.

गारगोटी (ता. भुदरगड) येथे चाललेल्या मराठा ठिय्या आंदोलनाचा शुक्रवारचा दिवस वैशिष्टय़पूर्ण ठरला. गारगोटी व्यापारी असोसिएशन, अंगणवाडी सेविकांनी   सकाळचा पाठींबा दिलेला तर वडाप संघटनेने वाहनासहित रॅली काढून आंदोलनाला मोठय़ा प्रमाणात चैतन्य आणले.

येथील इंजुबाई सांस्कृतिक हॉलमध्ये प्रसिद्ध वकील शिवाजीराव राणे यांच्या पुतण्या विश्वजीत याचा विवाह चि.सौ.का. गायत्री यांच्याशी होता. विवाहासाठी जिल्हय़ातील प्रति÷ाrत मान्यवर उपस्थित होते.

 गेले चार दिवस तहसिलदार कार्यालयाच्या दारात मराठा ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आदोलनस्थळी जाऊन आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय नव वधु-वरांने घेतला. ज्ये÷ाचा आशिर्वाद घेऊन त्यांनी थेट आंदोलन मंडप गाठला. प्रथमतः छत्रपती शिवारायांच्या पुतळयाचे दर्शन घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

आजच्या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल देसाई, प्रा. अर्जुन अबिटकर, प्रविणसिंह सावंत, नंदकुमार शिंदे, रणधीर शिंदे, बजरंग कुरळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, तालुका प्रमुख अविनाश शिंदे, मच्छिद्र मुगडे ,शिवराज देसाई, शरद मोरे, संदीप देसाई, दीपक मेटल, संजय मेटल, सुरेश चौगले, संग्राम सावंत, पापा गायकवाड, विलास मोरे, संतोष चौगले, अभिजित नलवडे, संग्राम पोफळे, अरुण शिंदे, महेश सुतार यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

 

Related posts: