|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कणेरी, कणेरीवाडीत कडकडीत बंद

कणेरी, कणेरीवाडीत कडकडीत बंद 

वार्ताहर/ गोकुळ शिरगाव

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शुक्रवारी कणेरी, कणेरीवाडी, कणेरी फाटा (ता. करवीर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनास गोकुळ शिरगाव मॅन्यूफॅक्चर असो. व उद्योजकांनी पाठींबा दिला. यावेळी मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाची सुरूवात कणेरी, कणेरीवाडी, दत्त कॉलनी, माधवनगर, त्रिमूर्ती नगर येथून करण्यात आली. गोकुळ शिरगाव, एमआयडीसी चौकात मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी प्रदीप केसरकर या युवकाने मराठा आरक्षणासाठी येथूनपुढेही लढा देऊ, असे सांगितले. या आंदोलनावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक उपस्थित होते. तर उद्योजक मोहन मुल्हेरकर यांनी मराठा आरक्षणास गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्योजकांचा पाठींबा राहील, असे सांगितले.

यावेळी जि. प. सदस्य सरिता खोत, कणेरीच्या सरपंच उज्ज्वला शिंदे, उपसरपंच राजू खेराडे, कणेरीवाडी सरपंच शोभा खोत, माजी सरपंच पांडुरंग खोत, विनोद खोत, नेर्लीचे सरपंच प्रकाश पाटील, बाळासा शिंगटे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सूर्यकांत पाटील, अमोल पाटील, उदय चोरडे, विजय पाटील, अंकुश पाटील, अमन शिंदे, उद्योजक चंद्रकांत जाधव, लक्ष्मीदास पटेल, अजित आजरी, स्वरूप कदम, रमेश मोरे, सुरजित पोवार, प्रकाश पाटील, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. रमेश पाटील उपस्थित होते.

Related posts: