|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुस्तीतील कर्जबाजारी शेतकऱयाची आत्महत्या

मुस्तीतील कर्जबाजारी शेतकऱयाची आत्महत्या 

प्रतिनिधी/ सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील शेतकरी सूर्यकांत महादेव पाटील (वय 60) यांनी साखर कारखान्याकडून बिल न मिळाल्याने व कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.

पाटील यांनी 30 जुलै रोजी राहत्या घरात रोगर नावाचे विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे सूर्यकांत यांना त्रास होऊ लागल्याने, उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान पाटील हे मरण पावले. या प्रकरणाची नेंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली आहे.

उसाचं बिल न मिळाल्यान पाटील आ†िर्थक अडचणीत आले होते. यातून आपण जीवन संपवत असल्याची चिठ्ठी पाटील यांच्या खिशात सापडली आहे. येत्या 10 ऑगस्ट पर्यंत कारखानदारांनी शेतकऱयांची बिले अदा करावीत, अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला  आहे.

तात्काळ मदत देऊ

ज्या साखर कारखान्याने शेतकारी पाटील यांचे बिल थकवले आहे. त्या कारखान्याने ते बिल तत्काळ देणे बंधनकारक असतानाही त्यांनी थकवले आहे. साखर कारखानदारी कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे की 14 दिवसांच्या आत शेतकऱयांना उसाचे बिल देणे बंधनकारक आहे. परंतु साखर कारखानदाराने नियमाचे उल्लघन केले आहे. तरी ज्या शेतकऱयांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटूंबियांना तत्काळ मदत करण्यात येईल.

राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी.

Related posts: