|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ट्रक मोटारसायकलच्या धडकेत बालिकेसह दोघांचा जागीच मृत्यू

ट्रक मोटारसायकलच्या धडकेत बालिकेसह दोघांचा जागीच मृत्यू 

प्रतिनिधी/ मोहोळ

मंगळवेढा ते घोडेश्वर ता मोहोळ या राज्य रस्त्यावर रॉग साईडने येऊन ट्रक चालकास वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने समोरून आलेल्या मोटारसायकलला जोराची घडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये पाच वर्षाच्या छोटय़ा मुलीसह दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला समोरुन धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले. सदाशिव आंबादास गुंड (वय 58), कमल सदाशिव गुंड (वय 50), आरती अमोल गुंड (वय, 5. सर्व रा. शिवणी उत्तर सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात शुक्रवारी रोजी सोलापूर मंगळवेढा रोडवर इंचगाव ते घोडेश्वरच्या दरम्यान घडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवणी (ता. उत्तर सोलापूर) येथील सदाशिव आंबादास गुंड हे आपल्या मोटारसायकल (क्र. एम. एच. 13. ए. एम. 7776) वरुन मंगळवेढय़ाच्या दिशेने नातेवाईकाकडे निघाले होते. त्यांची मोटारसायकल सावकास चालवीत होते. त्यावेळी त्यांची पत्नी सौ कमल आणि 05 वर्षाची चिमुकली नात आरती त्यांच्या सोबत होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांची दुचाकी इंचगाव ते घोडेश्वरच्या दरम्यान आली असताना समोरुन भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (क्र. एम.एच.20. ए.टी. 3900) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात ते तिघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. या अपघाता मध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला. त्यामुळे सोलापूर मंगळवेढा रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण उंदरे यांनी त्यांच्या सहकार्यसह घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामतीच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.

या प्रकरणी कामती पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ढवळे करीत आहे. अपघातास केवळ वाहतुकीचे नियम न पाळत्याने राग साईडने आल्याने मोटारसायकलस्वाराची काहीही चुक नसताना हकनाक जीव गमवावा लागला.

 

Related posts: