|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात

क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात 

प्रतिनिधी / सातारा

सातारा नगरपालिकेच्या शाळा क्र. 20 मधील तक्षशिला विद्यामंदिरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते राजू जेधे व  नगरसेविका रजनी जेधे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पेढे वाटून क्रांतिसिंहांची जयंती साजरी केली. योगायोग म्हणजे राजू जेधे यांनी आपला वाढदिवसानंतर  दुसऱयाच दिवशी क्रांतिसिंहानां अभिवादन करुन वाढदिवस केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष कारंडे, उद्योजक रामभाऊ कदम, प्रकाश जेधे, अजित जगताप, ओमकार तपासे, ज्योती सोनवलकर, अनिकेत चव्हाण  आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला जेधे यांच्या हस्ते पुष्पहार व दीपप्रज्वलन करुन उपस्थितांनी अभिवादन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटण्यात आले. 

नगरसेविका रजनी जेधे म्हणाल्या, नगरपालिकेच्या माध्यमातून व व्यक्तिश: या शाळेला संपूर्ण सहकार्य करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध  आहे. भविष्यात ही शाळा दत्तक घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

अजित जगताप म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. कार्यक्रमाला मल्लेश जानकर, जया जाधव, सुरेश जानकर, बाळू  प्रकाशे, ऋतुराज शिंदे, नितीन लोंढे, सागर जेधे, आदित्य जेधे तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ओमकार  तपासे यांनी केले.