|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » यशोदा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षांचा निकाल 93 टक्के

यशोदा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षांचा निकाल 93 टक्के 

प्रतिनिधी/ सातारा

येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशोदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा प्रथम वर्षाचा निकाल 93 टक्के लागला आहे. तर कम्प्यूटर सायन्स, इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन या विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्याबरोबरच बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग, एनर्जी ऍण्ड एनव्हायरमेंट इंजिनअरिंग, कम्युनिकेशन स्कील्स या विषयांचा निकालही 100 टक्के लागला आहे. 

यशोदा इंजिनिअरिंग कॉलेज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिर्व्हसिटी, लोणेरे अंतर्गत येत असून पहिल्याच वर्षी महाविद्यालयाने अत्यंत चांगल्या पद्धतीने यश मिळविले आहे. प्रथम वर्षात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तृप्ती झांजुर्णे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक मिळविला. त्याबरोबरच सायली शिंदे ( इ ऍण्ड टीसी), अश्विनी अंधारे (कम्युटर सायन्स), अमित मोरे (सिव्हील) निखील शेलार, संकेत बडदरे (मेकॅनिकल) या विद्यार्थ्यांनी आपल्या विभागात प्रथम क्रमांक मिळविला. 

या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. जे. व्ही. वारे, प्रा. एस. आर. टेके, के. डी. माने,  पी. जी. बोराटे, ए. बी. आटपाडकर, पी. एन. नार्वे, डी. व्ही. गोडसे, एस. एम. कंडारकर, प्रा. मोहम्मद युसुफ यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, संचालक प्रा. एन. जी. नार्वे, रजिस्ट्रार किशोर शिंदे. संवाद व जनसंपर्क संचालक प्रा. दीपक शिंदे यांनी अभिनंदन केले.