|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चैतन्य पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 15 रोजी आमरण उपोषण

चैतन्य पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 15 रोजी आमरण उपोषण 

प्रतिनिधी/ वडूज

येथील चैतन्य ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्थेकडून  पैसे देण्यास टाळाटाळ करण्याऱया व त्याना पाठिशी घालणाऱया अधिकाऱयांची चौकशी करावी. या मागणीसाठी 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा पतसंस्थेतील ठेवीदारांनी  निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनातील माहितीनुसार, चैतन्य पतसंस्थेत आमच्या लाखो रुपयांच्या ठेवी अनेक वर्षे आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या अंमलबजावणी पासून पतसंस्थेने ठेवीदारांनी मागणी केल्यानंतर ठेवींच्या रक्कमा परत देण्यात नकार देण्यास सुरुवात केली. पतसंस्थेचे चेअरमन संजय दिगंबर इनामदार, ज्योती संजय इनामदार, कांचन गजानन इनामदार, संतोष नंदकुमार इनामदार, व्यवस्थापक शैलेश रमेश देशपांडे, प्रसाद संजय इनामदार तसेच पतसंस्थेचे सर्व संचालक व कर्मचारी वर्ग यासर्वांनी मिळून पतसंस्थेच्या ठेवींच्या रक्कमेची अफरातफर केली आहे. तरी या घोटाळ्या संदर्भात दोन वेळा निवेदने देऊन ही काहीच कारवाई झाली नाही. तसेच पतसंस्थेवर कर्ज वसुली करता सहकार खात्यामार्फत कोणतीही कारवाई केली गेली नाही. वडूज पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक बॉडी, कर्मचारी यांच्यावरील तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. 

पैसे देण्यास टाळाटाळ

तालुक्यातील सर्व ठेवीदारांचे पतसंस्थेतील ठेवींचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱया अधिकाऱयांची चौकशी व्हावी. या मागणीसाठी 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे म्हटले आहे. व त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर राहील. असा इशारा ही निवेदनात देण्यात आला आहे. 

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सहकार मंत्री, जिल्हाधिकारी सातारा, जिल्हा दुय्यम निबंधक सातारा, तहसीलदार खटाव व वडूज पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. 

Related posts: