|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रविवार दि. 5 ते 11 ऑगस्ट 2018

मेष

सूर्य, गुरु केंद्रयोग, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. धंद्यात तुमच्याकडून कोणताही वाद वाढणार नाही याची काळजी घ्या. कष्ट घ्या. गुंतवणूक  नको. राजकीय – सामाजिक कार्याला वेग प्राप्त होईल. तरीही तुमच्या इच्छेनुसार घडणे कठीण आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला आव्हानात्मक असेल. संसारात तणाव व चिंता राहील. वाद वाढवू नका. कला, क्रीडा क्षेत्रात स्पर्धा वाढेल. योग्य सल्ल्याने कोणताही निर्णय घ्या.


वृषभ

चंद्र, बुध लाभयोग, शुक्र, मंगळ त्रिकोणयोग होत आहे. रविवारी तुमच्या मनाविरुद्ध एखादे काम करावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात सहजपणे यश मिळणार नाही, मेहनत घ्या. कायदा पाळा. तरीही या सप्ताहात समस्या कमी करता येतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. धंद्यात स्थिरता ठेवता येईल. घरातील वाद मिटवता येईल. कोर्टकेसमध्ये यशापर्यंत जाता येईल. नोकरीत वरि÷ मानतील.

मिथुन

सूर्य, बुध युती, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. सोमवार, मंगळवार कार्यात अडचणी येतील. राग आवरा. समस्या सोडवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी असेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. जीवनाला कलाटणी देता येईल. धंदा वाढवता येईल. योग्य ठिकाणी पैसा गुंतवा. कोर्टकेस जिंकता येईल. नोकरी लागेल. घरातील प्रश्न सुटेल.


कर्क

शुक्र, मंगळ त्रिकोण योग, सूर्य,बुध युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला करून घ्या. धंद्याला कलाटणी मिळेल. गुंतवणूक करणारे मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा. नाहीतर कायद्याच्या भोवऱयात अडकाल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासात पुढे जाता येईल. कोर्टकेसमध्ये साहाय्य मिळू शकेल. घरातील जबाबदारी कमी होईल.


सिंह

शुक्र, मंगळ त्रिकोण योग, सूर्य-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. धंद्यात कष्ट घेतल्यानुसार फायदा कमी मिळेल. कामगारांची कमतरता राहील. नम्रतेने बोला. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर चारी बाजूने दडपण आहे, असे वाटेल. मतभेद होतील. प्रति÷sवर टिका होऊ शकते. कला, क्रीडा  क्षेत्रात सहनशीलता ठेवा. प्रसिद्धीसाठी झगडावे लागेल. विद्यार्थी वर्गाने वडील माणसांचा अनादर करू नये.


कन्या

चंद्र, बुध लाभयोग, सूर्य, बुध युती होत आहे. महत्त्वाची कामे याच सप्ताहात करा. राजकीय- सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा लागेल. तुमचे धोरण दबावाचे ठरेल. यश मिळवता येईल. कायद्यात अडकू नका. तुमची लोकप्रियता वाढवता येईल. धंदा मोठा करण्याची संधी मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व लाभ मिळेल. घरात आनंदाची बातमी मिळेल. कोर्टकेस सरस ठरेल.


तुळ

चंद्र, मंगळ त्रिकोण योग, सूर्य बुध युती होत आहे. स्वत:च्या प्रकृती, करियर विषयी निश्चित धोरण ठरवा. हवेत कल्पना करू नका. ग्रहांची साथ असताना माणसाने आळस केल्यास ‘दैव देते कर्म नेते’ असे म्हणण्याची वेळ येते. राजकीय, सामाजिक कार्यात  सप्ताहाच्या सुरुवातीला वाद होईल. राग आवरा. घरात मतभेद होतील. खर्च अनाठायी होऊ शकतो. कला, क्रीडा क्षेत्रात ध्येय पहा. विद्यार्थ्यांनी आळस करू नये.


वृश्चिक

साडेसाती सुरू आहे. सूर्य, बुध युती, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. आळस माणसाला वाकडय़ापरीने  नेहमी नेत असतो. समजून उमजून तुम्ही चूक करत असाल तर त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्वांच्या विचाराने पुढे जा. घरात सप्ताहाच्या मध्यावर बाचाबाची होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गाने भविष्याचा विचार करावा.


धनु

सूर्य, नेपच्यून षडाष्टक योग, साडेसातीचे दुसरे पर्व सुरू आहे. या सप्ताहात राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे बोलणे सर्वांना घातक वाटेल. विरोधक तुम्हाला जवळ करण्याचा प्रयत्न करतील. घरात जबाबदारी  घ्यावी लागेल. तुमच्यावर आरोप येईल. इतरांनी केलेल्या चुकांचा परिणाम भोगावा लागेल. धंदा वाढवता  आला नाहीतरी सावधपणे चालू ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. मुलांनी बेजबाबदारपणे वागू नये.


मकर

सूर्य, बुध युती, चंद्र गुरु त्रिकोण योग होत आहे. साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. महत्त्वाची कामे रेंगाळत ठेऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात पुढे जा. जोमाने कार्य करा. वाद करण्यापेक्षा कार्यावर भर द्या. प्रति÷ा मान मिळेल. धंदा वाढेल. आर्थिक साहाय्य मिळू शकेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. घरातील तणाव कमी होईल. कोर्टकेस संपवा. परदेशात जाण्याची संधी मिळेल.


कुंभ

सूर्य, नेपच्यून षडाष्टक योग, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. या सप्ताहात सर्वच ठिकाणी कटकटी होण्याची शक्मयता आहे. घरात तुमचे विचार पटणे कठीण आहे. खाण्या पिण्याची काळजी घ्या. दगदग होईल. नातलगांच्या मदतीला …. लागेल. राजकीय, सामाजिक कायांत स्फोटक वातावरण असेल. तुम्हाला कायद्याच्या भोवऱयात अडकवण्याचा प्रयत्न होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी प्रयत्न करा.


मीन

सूर्य, बुध युती, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परतेने तुमची योजना  मार्गी लावा. धंद्यात वाढ होईल. पैसा मिळेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. घरातील तणाव कमी होईल. घर, वाहन, जमीन, खरेदी, विक्रीत फायदा मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. संयमाने वागा. यश मिळवा. कला- क्रीडा क्षेत्रात मोठे काम मिळेल. परीक्षेसाठी चांगली तयारी करता येईल. वेळेला महत्त्व द्या.