|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राज्यातील वीज दराबाबत ऊर्जामंत्र्यांच्या दुजाभाव

राज्यातील वीज दराबाबत ऊर्जामंत्र्यांच्या दुजाभाव 

उद्योगमंत्री सुभाष देसाई  यांचा घरचा आहेर

प्रतिनिधी/ कोल्हापूर

वीज दराबाबत इतर राज्याबरोबर आपल्या राज्यातही वीजेचा दर वेगवेगळा   आहे. मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात विजेच्या दरात सवलत, पश्चिम महाराष्ट्रातील  वीजग्राहक व उद्योजकावर  दरवाढीचा बोजा टाकला जात आहे. या दराबाबत उर्जामंत्र्यांशी  संघर्ष करावा लागत आहे. वीजेच्या दुजाभावामुळे,  जागतिक  स्पर्धेतच काय ? तर देशातही आपल्या उद्योगांची पिछेहाट सुरू आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वीज दराबाबत घरचा आहेर देतच, शेजारच्या राज्यातील परवडणाऱया दरातील वीज आपल्याकडे मिळावी, यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेणार आहे. अशी ग्वाही देतच, या बैठकीसाठी कोल्हापूरातील उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन  केले. शनिवारी उद्योगमंत्री कोल्हापूर दौऱयावर आले असता, विविध औद्योगिक संघटनांची बैठक हॉटेल सयाजीमध्ये झाली यावेळी ते बोलत होते.

जिल्हयातील विविध औद्योगिक वसाहतीमधील वीज दरवाढ, ईएसआय हॉस्पीटल ,विमानसेवा, ई-वे बील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआडीसी)असुविधा, भूखंड, दुहेरी घरफाळा अशा अनेक  प्रलंबित प्रश्नावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीसाठी ते कोल्हापूरात आले होते. आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह कोल्हापूर इंजिनियरींग असोसिएशन, गोशिमा,मॅक,स्मॅक,आयआयएफ, लक्ष्मी औद्योsगिक वसाहत,चांदी औद्योगिक वसाहतीसह विविध खात्यातील अधिकारी उद्योजक उपस्थित होते.

       ईएसआय हॉस्पीटलऐवजी एमआयडीसीचा भूखंड द्या

 राज्यातील वीज दराबरोबर ईएसआय हॉस्पीटल सुरू करण्याची मागणी औद्योगिक संघटनांकडून करण्यात आली. कामगाराकडून दर महीना वर्गणी भरून घेतली जाते. पण कामगारावर कोणताच उपचार होत नसल्याचे कोल्हापूर इंजिनियरींग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, गोशिमा अध्यक्ष सूरजितसिंग पवार ,इचलकरंजीचे शितल केटकाळे यांनी सांगून, गंभीर घटनेत कर्मचाऱयांना खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागते.यासाठी मोठा आर्थिक फटका बसत आहे. हे हॉस्पीटल तात्काळ सुरू करावे. अन्यथा एमआयडीसीचा भूखंड आम्हाला द्या,आम्ही तेथे हॉस्पीटल सुरूं करू अशी मागणी केली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ईएसआय हॉस्पीटल चालवणे हा  कटील प्रश्न झाला आहे. हे हॉस्पीटल लवकरात लवकर सुरू व्हावे म्हणून, मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा वारंवार होत आहे. याला पर्याय म्हणून खाजगी व निमखाजगी स्तरावर उद्योजकांनी कामगारासाटी हॉस्पीटल सुरू करण्याचा प्रयोग करावा असा विचार पुढे आणला. यासाठी एमआयडीसीमध्ये भूखंड देण्यास आपण तयार असल्याचे सांगितले.

सहकारी औद्योगिक संघटनाबाबत नविन धोरण आणण्यात येणार आहे.औद्योगिक संघटना प्रतिनिधी व विद्यापीठांच्या कुलगुरूंची शिखर बैठक लवकरच घेणार असून, याचा मसुदा जाहीर करण्यात येणार आहे. एमआयडीसी व ग्रामपंचायत असा दुहेरी कर उद्योजकांना भरावा लागत आहे. तसा कायदा ग्रामविकास विभागाने केला  आहे. या दुहेरी करामध्ये रस्ता,लाईट व कचरा याची जबाबदारी एमआयडीसीची असून, इतर सुविधा ग्रामपंचायतींने द्यावयाची आहे. विमान सेवेबाबत मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी बेठक घेण्याचे आश्वासन दिले. ई-वे बील,कौशल्य विकाससाठी भूखंड,हुपरी येथील सिल्व्हर झोन,एमआयडीसीतील पोलिस स्टेशन,ट्रक टर्मिनल,आयटीआयसाठी जागा,मोबाईर टॉवर आदी विषयावर त्या-त्या विभागाशी बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या चर्चेत ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव,गोशिमाचे अध्यक्ष सुरजितसिंग पवार, आयआयएफचे अध्यक्ष सुरेश चौगले, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, स्मॅकचे अतुल पाटील,उद्योजक मोहन मुल्हेरकर,उदय दुधाणे,नारायण मुदगल,मोहन कुशिरे, प्रदीप व्हरांबळ,sपांडुरंग मुळीक सहभागी झाले होते.बैठकीस जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक सतिश शेळके,देंवेंद्र दिवाण,सुरेंद्र जैन, अजित आजरी व विविध औद्योगिक संघटनेंचे प्रतिनिध्दी उपस्थित होते.