|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्वातंत्र्य दिनी’ झेडपीच्या शिरपेचात मानाचा तुरा

स्वातंत्र्य दिनी’ झेडपीच्या शिरपेचात मानाचा तुरा 

प्रतिनिधी/ सोलापूर

जिल्हा परिषदेच्या आपले सरकार विभागांतर्गत दहा दिवसांवर येवून ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनापर्यंत जिह्यातील बार्शी किंवा उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. पेपरलेस झालेला हा राज्यातील पहिला आणि एकमेव तालुका असणार आहे. स्वातंत्र दिनीच जिल्हा परिषदेकडून जिह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा असणार आहे.

गल्ली ते दिल्ली प्रशासनातील कारभार डिजीटल करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. डिजीटल अर्थात संगणकीकृत कामकाज हे पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असते हा मानस सरकारचा आहे. त्यामुळेच शासनाच्या अनेक योजना ह्या ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. सात बारा उताऱयासह अनेक उतारे, दाखले ऑनलाईन मिळवून देण्याची सोय शासनाकडून करण्यात आली आहे.

डिजीटलायझेशनच्या धर्तीवरच राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आपले सरकार नावाचा विभाग सुरु करण्यात आला आहे. याच विभागा माफ्&ढत पेपरलेस ग्रामपंचायती करण्याचे काम चालवले जात आहे.

ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी ग्रामपंचायती संगणकीकृत केल्या जात आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतीमधील सर्व जन्म-मृत्यू नोंदी, सर्व प्रकारचे दाखले हे संगणकीकृत केले जातात. त्यानंतर ग्रामपंचायतीचे दफ्तर सिल करत पंचायत समितीकडे जमा केले जाते. त्यानंतर ग्रामपंचायतीमधील कोणतेच कामकाज कागदावर चालवले जात नाही. तर संगणकावरुन केले जाते. यासाठी आपले सरकारकडून एक सॉफ्टवेअर ग्रामपंचायतींना दिले जाते. हे सॉफ्टवेअर इंटरनेट शिवाय चालते. त्यामुळे ग्रामीण भागात याला कसलीच अडचण येत नाही.

सोलापूर राज्यात अव्वल

पेपरलेस ग्रामपंचायती करण्यामध्ये सोलापूर जिल्हापरिषद राज्यात अव्वल राहिली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे आपले सरकार हा विभाग प्रभावीपणे चालवला जात आहे. जिह्यातील 1 हजार 259 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 323 ग्रामपंचायती पेपरलेस करण्यात आल्या आहेत.

बार्शीची सरशी कायम

पेपरलेस ग्रामपंचायती करण्यामध्ये सुरुवातीपासूनच बार्शी तालुका आघाडीवर राहिला आहे. आजही 77 ग्रामपंचायती पेपरलेस करत बार्शीची सरशी कायम राहिली आहे. त्याखालोखाल सांगोला 42, करमाळा 37, माळशिरस 30, माढा 29, दक्षिण सोलापूर 27, पंढरपूर 25, मंगळवेढा 21 आणि उत्तर सोलापूर तालुका 10 ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत.

Related posts: