|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मराठा विद्यार्थ्यांसाठी ऑगस्टअखेर वसतीगृह सुरू करा

मराठा विद्यार्थ्यांसाठी ऑगस्टअखेर वसतीगृह सुरू करा 

प्रतिनिधी/ सोलापूर

राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेत सोलापूर जिह्यात उच्च शिक्षण घेणारे सुमारे 5 हजार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना 50 टक्के फी माफ केली की नाही. याची माहिती घेण्यात येणार आहे. फी माफ न करणाऱया महाविद्यालयांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच ऑगस्टअखेर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अशी माहिती जिल्हाधिकारी भोसले डॉ. भोसले यांनी सांगितले.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिसीद्वारे राज्यातील सर्व जिह्यांची माहिती घेतली, यावेळी सोलापुरातून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी मुख्यमंत्र्यांना विविध योजनेची माहिती दिली.

  राज्यातील ज्या महाविद्यालयांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला नाही अशा शिक्षणसंस्थांची बैठक येत्या दोन दिवसात घ्यावी व समस्येचे निराकरण करून विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने पेडीट गॅरंटी दिली असल्याने आता कर्जप्रकरणे तातडीने मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक जिह्याच्या ठिकाणी मराठा विद्यार्थीसाठी वसतीगृहे सुरू करण्यासाठी विनापरवाना इमारती, खासगी इमारती घेवून ऑगस्टअखेर पर्यंत वसतीगृहे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

   मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिह्यात वसतीगृह करण्याची योजना शासनाने केली आहे. तिच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी एकत्रित बैठक घेऊन जिह्यातील विनापरवाना असलेल्या शासकीय इमारतींची डागडुजी करावी अथवा खासगी इमारती भाडय़ाने घेऊन 15 दिवसात अहवाल द्यावा व याठिकाणी ऑगस्टपर्यंत वसतीगृह सुरू होती यासाठी प्रयत्न करावीत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

   यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पाऊस आणि पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा यंत्रणेकडून घेतला. ज्या भागात पावसाचा खंड पडलेला आहे तेथे संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱयांना सांगितले.