|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शब्दाने नव्हे तर संघटन शक्तीच्या माध्यमातून समर्थन

शब्दाने नव्हे तर संघटन शक्तीच्या माध्यमातून समर्थन 

 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 कोणाच्याही आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आहे. ही भूमिक मान्य असून केवळ शब्दाने नव्हे तर संघटनेच्या शक्तीच्या माध्यमातून समर्थन देणार असल्याची ग्वाही बामसेफचे वामन मेश्राफ यांनी दिली.

गेल्या 12 दिवसांपासून दसरा चौकात मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरु आहे. रविवारी बामसेफच्या हजारो कार्यकर्त्यांसह वामन मेश्राम यांनी अर्यर्विन ख्रिचन हायस्कूल ते दसरा चौक असा मोर्चाने आंदोलनस्थळी येवून पाठींबा दिला. आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या विनायक गुदगी याला श्रदांजली वाहण्यात आली. यानंतर ते बोलत होते.

मेश्राम म्हणाले, ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाची भूमिका मंजूर नव्हती. ओबीसीमधून नव्हे तर मराठा समाजाला ब्राम्हण समाजातील कोटय़ातील हे आरक्षण देणार असल्याचे पाठवून दिली. यानंतर सर्वांना ही भूमिका मान्य झाली. बामसेफ केवळ शब्दाने नव्हे तर संघटनेच्या शक्तीच्या माध्यमातून समर्थन देणार आहे. मराठा समाजाने ते मनापासून स्वीकारवे.

  इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, 1932 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळय़ाला अभिवादन केले होते. त्यामुळे दसरा चौकाला वेगळे महत्व आहे. डॉ. आंबेडकरांनी ‘शुद्र पुर्वी कोण होते’ यामध्ये सांगितलेल्या मूलनिवासीमध्ये मराठा समाजाचाही समावेश आहे, हे आता मराठा समाजाला मान्य आहे. कारण मराठा समाजातील मुले आता इतिहास, राज्यशास्त्राचा अभ्यास व संशोधन करीत आहेत. त्यातून त्यांना समजू लागले आहे. गेल्या महिन्यांपासून मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू असूनही फडणवीस सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेत नाही. सरकारच्या पाठीमागे जे डोके आहे, ते मराठा समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. सर्व बहुजन एक आहेत, हे सरकारने लक्षात घ्यावे. मराठा समाजाकडे ताकद आहे. या आंदोलनात कोणीही नेता नाही. पण मेश्राम साहेब तुमच्याकडे संघटन आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तुम्ही संघटनेसह पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाच्या पाठीशी राहा, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी केले.

  बामसेफचे गौरव पणोरीकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळणे संिवधानिक अधिकार आहे. मात्र, घटनेतील कलमांची अंमलबजावणी करण्यासाठी संसद व विधान परिषदेतील सदस्यांनी या प्रमाणे प्रयत्न केले पाहिजेत.

भांडणे नाही आता एकोपाने सामोरे जावू

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काही शक्ती मराठा व इतर समाजात भांडणे लावात असल्याचे  सांगितले. याचाच धागा पकडत मेश्राम म्हणाले, काही शक्तींकडून मराठा इतर समाजमध्ये भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. येथून पुढे मराठा व इतर समाजामध्ये भांडणे लागणार नसून एकोपाने अशा दृष्ट शक्तीसमोर  जावू,

दसरा चौकात तिसरे सत्र

 बामसेफचे कोल्हापुरात 36 जिल्हय़ातील कार्यकर्त्यांच्या समवेत राज्यव्यापी अधिवेशन होते. तीन सत्रामध्ये अधिवेशन होते. यामधील तिसरे सत्र रद्द करून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी आलो. दसरा चौकातच हे तिसरे सत्र झाले असल्याची स्पष्टोक्तीही मेश्राम यांनी दिली.