|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » उद्यापासून 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर

उद्यापासून 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

सातव्या वेतन आयोगावर अंमलबजावणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून तीन दिवसीय संपावर जाणार आहेत. राज्य सरकरी कर्मचारी समन्वय संघटनांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला. एकूण 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

या संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद , नगरपालिका कर्मचारी , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. सरकारने वारंवार फसवणूक केल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे, अशी कर्मचाऱयांची भावना असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. राज्यात होणारी 72 हजार पदांची मेगा भरती मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यात एवढी पदे रिकामी असल्याने कर्मचाऱयांवर मोठा ताण पडत आहे. शिवाय सातवा वेतन आयोगाने लागू करावा ही देखील मागणी करण्यात आली आहे.