|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जैतापूर विरोधात 27 रोजी जेलभरो

जैतापूर विरोधात 27 रोजी जेलभरो 

जनहक्क सेवा समिती आक्रमक

प्रतिनिधी /राजापूर

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात जन हक्क सेवा समिती पुन्हा आक्रमक झाली असून 27 ऑगस्ट रोजी प्रकल्पस्थळी जेल भरो आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण यांनी दिली.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलन सुरु होऊन 12 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या दरम्यान नुसते कागदोपत्री कारारामागे करार होत आहेत. मात्र अंतिम उभारणीसाठीचा करार दृष्टिपथातही नाही. आधीचे काँग्रेस आणि सध्याचे भाजपा ही दोन्ही सरकारे या प्रकल्पाला समर्थन देत जनतेच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत आहेत. सध्या भाजपा वगळता अन्य सर्वच राजकीय पक्ष व त्या पक्षातील नेते परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला राजकीय विरोध करीत आहेत. मात्र त्याहून लाखपटीने विध्वंसक असणाऱया जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सोयीस्कर मौन धरून असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर कोकण रक्षणाची सत्याची बाजू लावून ठेवण्यासाठी अणुऊर्जा प्रकल्पा विरोधात 27 ऑगस्टला प्रकल्पस्थळी जेल भरो आंदोलन करून मच्छिमार व शेतकरी शासनाला तीव्र विरोधाची जाणीव करून देणार आहेत. या जेल भरो आंदोलनाची तयारी व दिशा ठरविण्यासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जन हक्क सेवा समितीची साखरी नाटे येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय घतानाच आंदोलनातील सातत्य कायम ठेवून कोकणासाठी व महाराष्ट्रासाठी घातक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊ न देण्याचा खंबीर निर्धारही व्यक्त करण्यात आला.

या बैठकीत समितीचे अध्यक्ष सत्यजीत चव्हाण, उपाध्यक्ष मन्सूर सोलकर, पंचायत सदस्य मोईद खादु, मच्छिमार नेते अमजद बोरकर, कार्यकर्ते फकीर मोहम्मद सोलकर, नदीम तमके, फैरोज गोवळकर, इरफान कोटवडकर, मुबारक गैबी, अब्दुल्लाह सायेकर आदी उपस्थित होते.

Related posts: