|Sunday, April 21, 2019
You are here: Home » क्रिडा » रॉजर्स चषक स्पर्धेतून बोपण्णाची माघार

रॉजर्स चषक स्पर्धेतून बोपण्णाची माघार 

वृत्तसंस्था/ टोरँटो

सोमवारपासून येथे सुरू झालेल्या एटीपी टूरवरील रॉजर्स चषक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेतून भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णाने दुखापतीमुळे शेवटच्याक्षणी माघार घेतली आहे.

या स्पर्धेत तो पुरूष दुहेरीत सहभागी होणार होता. तथापि दुखापतीने त्याला ही स्पर्धा सोडावी लागली. आता तो 14 ऑगस्टला जकार्तामध्ये दाखल होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत बोपण्णा आणि डी. शरण पुरूष दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. जकार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धा 18 ऑगस्टपासून होईल.

Related posts: