|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

अमावास्येला दीप पूजन करा

बुध. दि. 8 ते 14 ऑगस्ट 2018

आषाढी अमावास्येला ऊस अथवा आंबा किंवा उपलब्ध असणारे नारळ वगैरे फळांच्या रसाने लक्ष्मीला  अभिषेक करा. आपले व इतरांचे सर्वार्थाने भले व्हावे ही भावना ठेवून ती पूजा करा. त्याचा फार मोठा लाभ होतो. इतरांनाही सांगा, त्यांचेही कल्याण होईल. दिव्याचे अनेक मंत्र आहेत. शुभं करोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते ।। दीपज्योती : परब्रह्म दीपज्योतीर्जनार्दन:। दीपो हरिती पापानि संध्या दीप नमोस्तुते। भो दीप ब्रह्मरुपस्तवं ज्योतिषाम प्रभुरव्यय:। आरोग्यं देही पुत्रांश्च सर्वान कामानश्च देहि मे।। हा मंत्र आपल्याला जमेल तितका पण जास्तीत जास्त वेळा म्हणावा. 108, 1008, 11000 या प्रमाणे कितीही वेळा म्हणा त्यानंतर ‘इडापिडा टळो घरातील पीडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी आत येवो’, घरच्या धन्यासह सर्वांना उदंड आयुष्य लाभो’ असे एकदा म्हणावे. मुलांनाही म्हणण्यास सांगा, त्याचा निश्चित चांगला व रोकडा अनुभव येईल. ही अमावास्या सर्व बाबतीत कल्याण करणारी आहे. व्यसन, मांसाहार वगैरे मार्गाने तिचे पावित्र्य भंग होईल, असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होऊ देऊ नका. या अमावास्येच्या दीप व लक्ष्मी पूजनाने बरीच संकटे नाहीशी होतात, पण हे सगळे जरी खरे असले तरी आपली बाजू सत्याची असेल, तरच दैवी शक्तीचे सहाय मिळेल हे विसरु नये. हेतू चांगला असेल तर या अमावास्येच्या पूजनाने तुमचे सर्वार्थाने कल्याण होईल. शिक्षणात यश, लक्ष्मीची कृपा, सांसारिक जीवनात मंगलमय वातावरण, आर्थिक सुबता, आरोग्य लाभ, मनोकामना पूर्ती मुलाबाळांचे कल्याण, नोकरी, उद्योग व्यवसायात भराभराट, करणीबाधा, नष्ट होणे, अनिष्ट प्रवृत्तीच्या शक्तीपासून रक्षण, शिक्षणात चांगले यश, अपघात व दुर्घटनेपासून रक्षण यासह अनेक फायदे होतात. तांबे, सुवर्ण, चांदी अशा धातुचे दिवे त्या दिवशी लावतात. तांब्याचा दिवा सर्वश्रे÷ मानलेला आहे. दिव्याचे पावित्र्य फार पाळावे लागते. अशुद्ध अवस्थेत दिवा पेटवू नये, अथवा पेटत्या दिव्याला स्पर्श करू नये, कोणतेही कार्य  करण्यापूर्वी दिव्याला साक्षी ठेवूनच  ते काम करतात. औक्षण करणे,ओवाळणे वगैरे प्रकार दिव्याशी संबंधित आहेत. काही धमांत लोक मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करतात. हिंदू धर्मियांनी अशी घोडचूक कधीही करू नये, अन्यथा अरिष्टाला आमंत्रण दिल्यासारखे होते. देवासमोर दिवा पेटून पेटती काडी काहीजण पायाने विझवितात, हे चुकीचे आहे. अग्निचा अपमान म्हणजे दिव्याचा अपमान व पुढे संकटाला निमंत्रण हे लक्षात ठेवावे. दिव्याचा जितका मान ठेवाल त्या प्रमाणात अनेक पिढय़ांचा उद्धार होतो, तर दिव्याचा अपमान केल्यास अनेक पिढय़ांना त्याचे दुष्परिणाम  भोगावे लागतात. दिवा अथवा अग्नि कधीही ओलांडू नये अथवा त्याला पाय लावू नये. काही जत्रेत इंगळे यात्रा असतात,पेटत्या विस्तवातून लोक पळत असतात, वास्तविक हे चुकीचे आहे. अग्निला तुडवून त्यावर पळत जाणे हा अग्निचा घोर अपमान आहे. त्यामुळे अशा प्रथा बंद करणे आवश्यक आहे. दिव्याचा अथवा अग्निचा अपमान म्हणजे स्वत:हून दारिद्रय़ाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. संपूर्ण कुटुंबाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

मेष

वास्तुदोष, करणीबाधा, वाईट स्वप्ने पडणे, भयानक शत्रुपीडा, आरोग्यात बिघाड असे अनुभव  येत असतील तर येत्या अमावास्येला दीपपूजन करा. चांगला फरक जाणवेल. आरोग्य बिघडणं व प्रखर शत्रुपीडा असेल तर तीही कमी होईल. या अमावास्येला देवधर्माकडे अधिक लक्ष द्या. घराण्यातील अनेक शापीत दोष नष्ट करण्याचे सामर्थ्य या अमावास्येच्या दीपपूजनात आहे.


वृषभ

सुख समृद्धी व धनलाभ यांचा संगम असलेली दीप अमावास्या आहे. या अमावास्येला घरात सर्व दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन करा. नातेवाईक व इतर लोकांकडून होणारा त्रास कमी होईल. लोक चांगले वागू लागतील. पूर्वी जर कोठे मोठी गुंतवणूक केलेली असेल तर त्याचा फायदा मिळण्याची शक्मयता आहे. घरात जर कुणाला व्यसन असेल तर मात्र या अमावास्येला शुभ फळ मिळणार नाहीत.


मिथुन

मानसिक ताणतणाव व आर्थिक अडचणी दर्शविणारी ग्रहस्थिती आहे. घराण्यातील पितरांचे काही दोष असतील तर ते या दीप अमावास्येच्या पूजनाने कमी होतील. घराण्यात जर दृष्टीबाधा असेल किंवा सावकारी दोष असतील तर ते दोषही नष्ट होतील. आर्थिक व्यवहार अतिशय जपून करा. किरकोळ चुकादेखील उग्र स्वरुप धारण करू शकतील.


कर्क

तुमच्या राशीतच होत असलेली  सौभाग्य योगावरील अमावास्या तुमच्या अनेक समस्या सोडविण्यास सहाय्यक ठरेल. धोक्मयात असलेली प्रति÷ा, सुटलेली नोकरी, आर्थिक अडचणी, घरातील क्लेश वगैरे समस्या भेडसावत असतील तर या दीप अमावास्येला लक्ष्मी पूजन करा, बरेच प्रश्न सुटतील. कोणतेही  प्रश्न प्रति÷sचे करू नका. नुकसान होईल. तसेच कुणाच्याही सांगण्यावर विश्वास न ठेवता स्वत:च्या मनाने निर्णय घ्या.


सिंह

मोक्षस्थानात दीप अमावास्या होत आहे. करणीबाधेचे आघोरी प्रकार वशिकरण वगैरे करणारे अशा लोकांचा त्रास होत असेल, घरदार व उद्योग व्यवसाय डबघाईला आलेला असेल तर या अमावास्येला घरात दीपपूजन करून लक्ष्मीपूजन करा. सर्व बाधा दूर होतील व जीवन जगण्याचा नवा मार्ग दृष्टीस पडेल. सर्व कामात यश देईल. शत्रूवर विजय मिळवाल.


कन्या

सौभाग्य योगावरील अमावास्या तुम्हाला अनेक बाबतीत मोठे यश देणारी ठरेल. नवनवे स्नेहसंबंध, मित्रमैत्रिणींचे सहकार्य, धनलाभ तसेच हाती घेतलेल्या कामात मनाजोगते यश मिळू शकेल.  धनलाभाच्या दृष्टीने ही अमावास्या तुम्हाला अतिशय  महत्त्वाची ठरू शकेल. या अमावास्येला दीपपूजन करा. त्याचा चांगला अनुभव येईल. विशेषत: लक्ष्मीपूजन किंवा सर्पपूजन केल्यास अधिक चांगले ठरेल. घराण्यातील अनेक दोष या अमावास्येच्या पूजनाने नष्ट होतील.


तुळ

दशमात होणारी अमावास्या नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरेल. अनेक प्रश्न सुटतील. घराण्यात वडीलांच्या नात्याकडून आलेले अनेक दोष या अमावास्येच्या पूजनाने नाहीसे होतील. वास्तुदोष असेल तर तो नष्ट करण्यासाठी वास्तुत दीपपूजन करावे. त्याचा चांगला अनुभव येईल. वडीलधारी माणसांचा काही प्रश्न असेल तर तो या आठवडय़ात सुटेल. ही आमवास्या तुम्हाला सर्व तऱहेची समृद्धी मिळेल.


वृश्चिक

सुखसमृद्धीच्या रुपाने दीप अमावास्या आलेली आहे. या अमावास्येला केलेले दीपपूजन तुमचे जीवन बदलून टाकील. एखादी व्यक्ती हरवली किंवा परागंदा झालेली असेल, दत्तक मुलाकडून त्रास होत असेल, घरात सतत काही ना काही कटकटी सुरू असतील तर त्या या दीप अमावास्येच्या पूजनाने ते दोष नष्ट होऊ शकतील.


धनु

सध्या शनिची साडेसाती सुरू आहे. अमावास्या शुभ असली तरी अतिशय प्रखर आहे. परणीबाधा, शापीत दोष जाण्यासाठी येत्या अमावास्येला दीपपूजन केल्यास बरीच संकटे दूर होतील. कार्यात अडथळे व धननाश अशी फळे या अमावास्येला मिळण्याची शक्मयता आहे.


मकर

सप्तमस्थानी अमावास्या होत आहे. वैवाहिक जीवनात महत्त्वाच्या घटना घडविणारी ही अमावास्या आहे. प्रवासात येणाऱया अडचणी, वैवाहिक समस्या अशा समस्यात घेरलेला असाल तर या अमावास्येला दीपपूजन करा. संशय वातावरण, प्रेमसंबंधांमुळे विकोपाला गेलेली प्रकरणे, भागीदारी व्यवसायात झालेले नुकसान, संततीप्राप्तीत असणारे अडथळे दूर होऊ शकतील.


कुंभ

मृत्यूषडाष्टकात अमावास्या होत आहे. आरोग्याच्या तक्रारी व शत्रुभय अशी याची फळे मिळण्याची शक्मयता असते. यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी. कुणाशी शत्रुत्व ओढवले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. ही अमावास्या सौभाग्य योगात  आहे. त्यामुळे दीपपूजन अवश्य करा. त्यामुळे बरीच संकटे दूर होतील. अनेक आर्थिक समस्यांवर मार्ग निघेल.


मीन

मुलाबाळांच्या समस्या, चुकीचे नियोजन, आर्थिक अडचणी व शारीरिक पीडा घेऊन ही अमावास्या आलेली आहे. त्याचा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या अमावास्येला योग्य मार्गाने दीपपूजन करा. त्यात बराच फायदा होईल. कोठेही गुंतवणूक करू नका, नुकसान होऊ शकेल. महत्त्वाची खरेदी, वाटाघाटी, प्रवास व बोलणी करताना काळजी घ्यावी.