|Monday, April 22, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » गुगलकडून क्रिकेटपटू दिलीप सरदेसाईंना मानवंदना

गुगलकडून क्रिकेटपटू दिलीप सरदेसाईंना मानवंदना 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारताचे महान क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या 78व्या जयंतीनिमीत्त गुगलने त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. गुगल हे इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्ज इंजिन आहे. गुगलने खास डूडल बूनवून सरदेसाई यांना श्रद्धांजली वाहीली आहे. 1971मध्ये सरदेसाई यांनी भारतीय क्रिकेटला एक वेगळे वळण दिले. तसेच, त्या काळात बलाढय़ समजल्या जाणाऱया इग्लंड आणि वेस्ट इंडिज सारख्या संघाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करण्याचीही खेळी करायलाही भारताने सरदेसाईंच्या काळातच सुरूवात केली.

8 ऑगस्ट 1940मध्ये गोव्यामध्ये जन्मलेल्या सरदेसाईंनी क्रिकेटमध्ये नाव कमावले. विदेशात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू म्हणून सरदेसाई यांना ओळखले जाते. सरदेसाई यांचे पूत्र आणि सुप्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एका मुलाखतीदरम्यान, म्हटले होते की, ’आपले वडील वयाच्या 17व्या वर्षांपर्यंतच्या आयुष्यात कधीही टर्फ विकेटवर खेळले नाहीत. त्यांच्या उदयापर्यंत गोव्यातून असा एकही क्रिकेटर पुढे आला नव्हता जो भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाचा घटक बनला’. सरदेसाई यांनी भारतीय संघाकडून 30 टेस्ट सामने खेळले. दुहेरी शतकासह सुमारे 5 शतके त्यांच्या नावावर आहेत. विजय मर्चंड यांनी त्यांना ’द रेनासांस मॅन ऑफ इंडिया’ म्हणून गौरवले. महत्त्वाचे असे की ज्या काळात आंतरराष्ट्रय सामने मोठय़ प्रमाणावर खेळले जात नसत. त्या काळात त्यांनी ही कामगिरी केली आहे. डावखूरा फलंदाज असलेले सरदेसाई एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. 1972मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांची आणखी एक खासीयत अशी की आपल्य एकूण कारकिर्दीत त्यांनी केवळ दोनच षटकार ठोकले. त्यांनी 1961मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली.

 

Related posts: