|Friday, March 22, 2019
You are here: Home » leadingnews » महाराष्ट्र कडकडीत बंद: पुण्यात मराठा आंदोलन चिघळले

महाराष्ट्र कडकडीत बंद: पुण्यात मराठा आंदोलन चिघळले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

     मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात जो हिंसाचार झाला त्याचा क्रांती मोच्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापुढे मागण्यांसाठी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय गुरूवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे.

जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर मोर्चा सुरूच राहिल असे आंदोलकांनी स्पष्ट यावेळी केले. आरक्षाबाबत चंद्रकांत दादा पाटील यांची उप-समिती तात्काळ बरखास्त करावी. यापुढील मोर्चाला कशापद्धतीने दिशा द्यायची, व पुढील आंदोलनाचे सर्व निर्णय हे परळीतूनच घेण्यात येतील. परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठक पार पडली त्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यापुढे सरकारसोबत चर्चा करण्यासाठी वेगळी समिती तयार करण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनामुळे जी हिंसा झाली, त्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त केली गेली असून, आंदोलनात असामाजिक तत्त्व घुसल्यामुळे हिंसाचार घडला असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. मोर्च्याचा उद्देश संपूर्ण राज्यात फक्त ठिय्या आंदोलन करणे हाच होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चाकणमध्ये केलेल्या हिंसाचाराप्रकरणी आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. यात 20 जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशिरापासून या अटकेच्या सत्राला सुरूवात झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जातीय तेढ निर्माण करणाऱया या समाज कंटकांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत सध्या करत आहेत. अशी माहिती ग्रामीणचे एसपी संदीप पाटील यांनी दिली आहे. चाकणमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण लागले. राज्यात कुठे नाही तेवढा विध्वंस पाहायला चाकणमध्ये मिळाला. चाकणमध्ये चाललेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडी आणि जाळपोळीत खासगी आणि सरकारी वाहनांचे मोठय़ प्रमाणात नुकसान झाले. या जाळपोळीत सरकारचे सुमारे 8 कोटींचे नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात 3 हजार आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यावर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

updates

 • औरंगाबादेत हिंसक वळण, दोन खासगी वाहने,  पोलिसांची  एक गाडी पेटवली
 • पुण्यातील हयात हॉटेलमधेय आंदोलकांची तोडफोड
 •  पुण्यातील चांदणी चौकात बंदला हिंसक वळण लागल्याची माहिती आत्ताच समोर आली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला आहे. आंदोलकांनी दगडफेक सुरू केल्याने पोलिसांना हा लाठीचार्ज करावा लागला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यानंतर हा निर्णय पोलिसांना घ्यावा लागला. 
 • लातूरमध्येही मराठा आंदोलनाला गालबोट लागले आहे. काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. नाशिकमधला प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा असाच प्रकार लातूरमध्ये घडला आहे. 
 • मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण,जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड
 • मुंबईतील मुख्य मासळी बाजार असलेल्या ससून डॉकमध्ये इतिहासात प्रथमच कडकडीत बंद
 • लोणावळा: आंदोलकांनी अडवली कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
 • नाशिकमध्ये काही ठिकाणी दगडफेक; तीन वाहनांचे नुकसान
 • अहमदनगर: औरंगाबाद-पुणे महामार्गावर नेवासा फाटा येथे रास्ता रोको, वाहतूक ठप्प
 • औरंगाबादेत उद्धव ठाकरेंच्या विरोधातील घोषणांवरून राडा…जाधववाडीत खासगी बस पेटवली

 • नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन
 •  पुणे : शहरात पीएमपीच्या ४ बस फोडल्या; अंतर्गत सेवा बहुतांश मार्गांवर बंद ठेवली 
 • नांदेड : बंदला उस्फूर्त प्रतिसाद; अनेक ठिकाणी रास्ता रोको
 • नाशिक- येवला तालुक्यातील पाटोदा येथे कडकडीत बंद
 • पनवेलमध्ये सर्वत्र शांतता; रिक्षा, बसेस व ट्रेन सुरू, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
 • अलिबाग एसटी आगाराच्या बसेस बंद; प्रवाशांचे हाल
 • नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्ग सकाळी ७ पासून बंदच; मराठा समाजाचा रास्ता रोको
 • चाकण येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा खंडीत
 • अकोल्यात मराठा आंदोलन पेटल्याची माहिती मिळतेय. येथे अखिल भारतीय छावा संघटनेने अकोला मूर्तिजापूर राज्यमार्ग रोखला. अकोल्यातील सांगळूद जवळ रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोखण्यात आला आहे.
 • बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे.
 • भोसरी एमआयडीसी देखील बंद आहे. एमआयडीसी परिसरात साडे तीन हजार, तसेच कुदळवाडी, तळवडे आणि शहरात अशा एकूण आठ हजार कंपन्यांवर परिणाम. या सर्व कंपन्यांमधील साडे तीन लाख कर्मचाऱ्यांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
 • पुण्यात कडकडीत बंद, रस्त्यांवर शुकशुकाट

 

Related posts: