|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गांव विकासाची तळमळ महत्त्वाची : दादासाहेब कांबळे

गांव विकासाची तळमळ महत्त्वाची : दादासाहेब कांबळे 

प्रतिनिधी /वडूज :

आपण ज्या गावात जन्मलो, ज्या मातीत वाढलो त्या भूमीचा सर्वांण विकास व्हावा, ही गांव विकासाची तळमळ अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.

पुणे येथील नर्मदा प्रकाशन, लायन्स क्लब पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, राजापूर येथील सावतामाळी मित्र मंडळ, ओंकार गणेशोत्सव मंडळ, मोरया मित्र  मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित मोफत शालेय साहित्य व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी लायन दामाजी आसबे, उपसभापती कैलास घाडगे, शिवाजीराव माने, पोलीस निरीक्षक घोडके, रणधीरशेठ जाधव, अभय राजेघाटगे, सरपंच काकासो डंगारे, हणमंत घनवट यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. कांबळे व इतर मान्यवरांनी राजापूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थांच्या माध्यमातून होत असलेल्या चांगल्या विधायक कार्याचे कौतुक केले. यावेळी लायन्स क्लब पिंपरी चिंचवड स्मार्ट यांच्या वतीने भवानीमाता मंदीर परिसरात केलेल्या वृक्षारोपणास वृक्षसंवर्धन व जाळ्या घेण्यास 5 हजाराची देणगी देण्यात आली. तर इयत्ता 10 वीमध्ये प्रथम आलेला अभिजीत सोमनाथ क्षीरसागर यांस 11 वी व 12वी साठी शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेत असल्याचे प्रा. अमृतराव काळोखे यांनी जाहीर केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश दिडके, दीपक गुरुजी, दशरथ गुरुजी, नितीन मोहिते, रजत घाटगे, संतोष काळोखे, दीपक (डी.वाय) घनवट, राहूल दिडके यांनी विशेष परिश्रम घेतले.