|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रहिमतपूर-वाठार किरोलीत बंदला प्रतिसाद

रहिमतपूर-वाठार किरोलीत बंदला प्रतिसाद 

वार्ताहर /वाठार किरोली :

‘मराठा आरक्षण देताय की, घरी जाताय’ अशा घोषणा देत मराठा समाजातर्फे वाठार किरोली येथे ग्रामपंचायतीसमोरील बाजारपटांगणात राज्य सरकारचा तीव्र निषेध करीत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता येथील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा दिला.

दरम्यान, एस.टी व खाजगी वाहतुकही बंद असल्याने विविध गावांना जाणाऱया परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सकाळी 10 वाजल्यापासूनच चौकामध्ये युवक व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाचा निषेध करीत आंदोलकांनी  वाठार-कराड रस्त्यावर रास्ता रोको केला होता. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता, तर शाळा व कॉलेजला सुट्टी असल्याने विद्यार्थी यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही. रहिमतपूर पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार कांबळे, वाहतूक पोलीस शेडगे व त्यांच्या सहकाऱयांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

रहिमतपुरात कडकडीत बंद

रहिमतपूर : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला रहिमतपूरमध्ये गुरुवारचा आठवडी बाजार असून सुध्दा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील व्यापाऱयांनी आपापली दुकाने बंद करून बंदला पाठिंबा दिला. सकाळ पासूनच गावातील सर्व व्यवहार बंद होते. गजबजलेल्या बाजारपेठेत यामुळे शुकशुकाट जाणवत होता.

Related posts: