|Friday, March 22, 2019
You are here: Home » उद्योग » सरकरकडून ‘निर्यात मित्र ऍप’ सादर

सरकरकडून ‘निर्यात मित्र ऍप’ सादर 

वृत्तसंस्था /मुंबई :

वाणिज्य आणि औद्योगिक मंत्रालयाकडून निर्यात मित्र नावाचे ऍपचे सादरीकरण करण्यात आले आहे. या ऍपच्या वापराने देशी आणि विदेशी व्यवहार करण्यात सोपे होणार, असून यांचा फायदा निर्यात क्षेत्राला होणार आसल्याची माहिती यादरम्यान वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

या ऍपची निर्मीती फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (फियो) यांनी तयार केले आहे. तर हे ऍप मोबाईलवर डाऊनलोड करता येणार आहे. तर याचा वापरातून एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट जीएसटी दर  बाजारातील चालू असलेल्या किंमती व व्यापाराशी संबंधीत असणारी माहिती या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

देशातील व्यापार आणि परदेशातील व्यापार यांची सविस्तर माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर आयटीसी एचएस कोडचे मुल्यमापन करता येणार असून सध्या या ऍपमध्ये 87 देशांचा डेटा उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

कंपन्याचा सहभाग या ऍपच्या माध्यमातून वाढवण्यात येणार आहे. यातून व्यापारी क्षेत्राला चांगले दिवस येणार असून लोकांचा व्यापाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होणार आसल्याचा विश्वास वाणिज्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Related posts: