|Monday, October 22, 2018
You are here: Home » उद्योग » निसानकडून मायक्रा दाखल

निसानकडून मायक्रा दाखल 

नवी दिल्ली :

निसान इंडिया कंपनी भारतासह जगभरात लोकप्रिय आहे. या कंपनीने भारतात मायक्रा कार सादर केली आहे. हि कार स्पोर्टसह नवीन फिचर्स सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती कारच्या सादरीकरणा वेळी देण्यात आली.
जपानी तंत्रज्ञानाचा वापर या कार तयार करताना करण्यात आला आहे. निसान मॉडेल भारतासह जगभरातील 100 देशातील लोकप्रिय मॉडेल म्हणून या कारचा गौरव केला जातो. निसान इंडियाकडून मायक्रा हे नवीन मॉडेल ग्राहकासाठी तयार करण्यात आले असल्याची माहिती निसान इंडियाचे अधिकारी हरदीप सिंह बाबर यांनी कारच्या सादरीकणावेळी स्पष्टीकरण दिले.
मायक्रा कारमध्ये पॉवरट्रेनचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यात दोन पॉवरट्रेन एक लिटर पेट्रोल इंजिन याचा वापर करुन आपण कोणत्याही लांब पल्याचा प्रवास करु शकतो. इतर गाडय़ापेक्षा सोपे फिचर्स वापरण्यास सोपे असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सुरक्षित फिचर्स
नवीन सुरक्षित फिचर्सच्या सुविधा निसानने लागू केल्या आहेत. यात एअर बॅग, स्पीड वॉर्निग डिव्हाईस, स्पीड नियंत्रण , डोर लॉक आणि सिट बेल्ट रिमाइंडर याचा समावेश या कारमध्ये करण्यात आला आहे.

Related posts: