|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » व्यक्तिमत्त्व विकासासाठी रोटरी उपयुक्त

व्यक्तिमत्त्व विकासासाठी रोटरी उपयुक्त 

निपाणी :

जगभरात पसरलेली इंटरॅक्ट चळवळ ही भारतात अधिक सक्रिय आहे. रोटरीच्या भविष्यासाठी इंटरॅक्टची कामगिरी महत्त्वाची आहे. तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे काम रोटरीकडून सुरु आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी रोटरी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन रोटरीचे जिल्हा गव्हर्नर संग्राम पाटील यांनी केले.

येथील केएलई सीबीएसई स्कूलमध्ये रोटरी क्लब पुरस्कृत इंटरॅक्ट क्लबच्या विविध ठिकाणच्या पदाधिकाऱयांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविकात सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या शर्मिष्ठा रॉय यांनी रोटरीचे महत्त्व व शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी केएलई सीबीएसईच्या इंटरॅक्ट अध्यक्ष म्हणून रिद्धी देशमाने तर सचिव म्हणून किर्ती चव्हाण यांची निवड करण्यात आली. यासह मराठा मंडळ, विद्यामंदिर, एम. डी. विद्यालय, गोमटेश स्कूल, कन्याशाळा, जी. एम. संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडी, पार्श्वमती कन्या विद्यालय अकोळ, ए. एस. पाटील हायस्कूल स्तवनिधी, काडसिद्धेश्वर हायस्कूल बेनाडी, टायनी टॉट्स स्कूल, खैर महंमद पठाण हायस्कूल, डी. एस. नाडगे हायस्कूल कारदगा, केएलई इंग्रजी माध्यम शाळा आदी विविध शाळांच्या इंटरॅक्ट क्लब पदाधिकाऱयांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.