|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱया भाजी विपेत्यांना समज द्या

रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱया भाजी विपेत्यांना समज द्या 

बेळगाव / प्रतिनिधी :

स्वातंत्र्य दिन आणि गणेशोत्सवादरम्यान शहरातील स्वच्छता व्यवस्थित करावी. रस्त्याशेजारी भाजी विपेते पोत्यांमध्ये कचरा भरून टाकत आहेत. त्यांना समज द्यावी, असा आदेश आरोग्य स्थायी समिती बैठकीत देण्यात आला. बैठकीवेळी नव्याने रुजू झालेल्या स्वच्छता निरीक्षकांची ओळख परेड घेण्यात आली.

महापालिकेच्या आरोग्य स्थायी समितीची बैठक गुरुवारी सुधा भातकांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शहराच्या स्वच्छतेबाबत चर्चा करून ज्या वॉर्डात स्वच्छतेचे काम व्यवस्थित केले जाईल त्या वॉर्डच्या स्वच्छता निरीक्षकांना बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा सुधा भातकांडे यांनी केली. त्याचप्रमाणे व्यवसाय परवाना मुदत संपलेल्या व्यवसायिकांकडे चौकशी करून व्यवसाय परवाना नूतनीकरण करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना करण्यात आली. टिळकवाडी येथे पराठा कॉर्नर या हॉटेल चालकाने रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हे अतिक्रमण तातडीने हटवून अशाप्रकारे अडथळा निर्माण करणाऱया व्यावसायिकांना सूचना देण्याचा आदेश बैठकीत देण्यात आला. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत शौचालय बांधलेल्या लाभार्थींना अद्यापही तिसऱया हप्त्याची रक्कम वितरित करण्यात आली नाही. आरोग्य स्थायी समितीने मंजुरी देऊनही अद्याप रक्कम वितरित का केली नाही, असा मुद्दा उपस्थित करून अधिकाऱयांना धारेवर धरण्यात आले. सदर रक्कम तातडीने देण्याची सूचना लेखा  विभागाच्या अधिकाऱयांना देण्यात आली. गॅस संपर्क योजनेंतर्गत गॅस जोडणी दिलेल्या गॅस एजन्सी मालकांची बिले अद्याप देण्यात आली नसल्याने नवीन गॅस जोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे गॅस एजन्सीची बिले अडवून न ठेवता तातडीने मंजूर करावीत, अशी सूचना सदस्यांनी केली. विविध विषयांवर चर्चा करून महापालिकेच्या राखीव निधीअंतर्गत राबविण्यात येणाऱया योजनांच्या लाभार्थींच्या निवडीला मंजुरी देण्यात आली.

Related posts: