|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आजऱयाच्या संभाजी चौकात सायंकाळपर्यंत ठिय्या

आजऱयाच्या संभाजी चौकात सायंकाळपर्यंत ठिय्या 

प्रतिनिधी /आजरा :

मराठा आरक्षणासाठी आजरा शहरात दुपारी चक्काजाम झाल्यानंतरही सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संभाजी चौकात सायंकाळपर्यंत ठिय्या मारला होता. तर मडिलगे येथे ग्रामस्थांनी आजरा-गडहिंग्लज राज्यमार्ग रोखल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत आरक्षणाबाबत न्यायालयात बाजू मांडण्यास विलंब केल्याबद्दल शासनाचा निषेधही नोंदविण्यात आला. यावेळी माजी सरपंच के. व्ही. येसणे, कारखान्याचे माजी संचालक सदाशिव जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, संदीप येसणे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे, अनिल निऊंगरे, भूषण कातकर, गणपती येसणे यांच्यासह मडिलगे येथील शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी मडिलगे येथे भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.

आजरा बाजारपेठ दर बुधवारी बंद ठेवली जाते. बुधवार दि. 8 रोजी आठवडा बंद असतानाही गुरूवारच्या बंदमध्ये सर्वच व्यापारी सहभागी झाले होते. यामुळे सलग दोन दिवस बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. सायंकाळी देखील व्यापारपेठ खुली झाली नव्हती. आंदोलनात शहरातील सर्वधर्मिय मंडळींनी सहभाग नोंदविला.

Related posts: