|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सकल मराठा राज्यव्यापी बंदला चंदगड तालुकावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकल मराठा राज्यव्यापी बंदला चंदगड तालुकावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

चंदगड :

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंद आंदोलनास चंदगड तालुकावासियांनी शंभर टक्के उस्फूर्त प्रतिसाद दर्शवून शांततेच्या वातावरणात कडकडीत बंद पार पडला. चंदगड तालुक्यातील नेहमीच्या गजबजलेल्या बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. चंदगड, कोवाड, बाजारपेठेत रस्त्यावर माणसे सुध्दा अभावानेच दिसत होती. थोडक्यात चंदगड तालुक्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने ‘शुकशुकाट’ अनुभवायला मिळाला. चंदगड शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात अली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे… नाही कुणाच्या बापाचे’ या घोषणांनी शहर दणाणून गेले. हलकर्णी फाटय़ावर बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर भव्य ठिय्या आंदोलन झाले. मराठा आरक्षणाची गरज यावेळी अनेकांनी अधोरेखित केली. तर चंदगड आणि कोवाड येथील आजचे साप्ताहिक बाजार बंद होते. या बाजारातून दर गुरूवारी लाखोंची उलाढाल होते. परंतु ‘आधी लग्न आरक्षणाचे’ या न्यायाने चंदगडकरांनी शंभर टक्के बंद पाळला. चंदगड, कोवाड, पाठोपाठ हेरे, कानूर, नागनवाडी, पाटणे फाटा, शिनोळी, हलकर्णी फाटा, माणगाव, अडकूर, तुर्केवाडी, पाटणे, कुदनूर, तुडये येथील बाजारपेठा कडकडीत बंद होत्या.

Related posts: