|Saturday, April 20, 2019
You are here: Home » क्रिडा » पावसामुळे पहिले सत्र वाया

पावसामुळे पहिले सत्र वाया 

वृत्तसंस्था /लॉर्ड्स, लंडन :

संततधारेमुळे भारत व इंग्लंड यांच्यातील दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी सकाळचे सत्र वाया गेले. मंगळवारी रात्रीपासूनच येथे पाऊस सुरू असल्याने मैदान ओलसर झाले असून सकाळी सरावासाठी देखील खेळाडू मैदानात उतरू शकले नाहीत. त्यामुळे नाणेफेकही झाली नव्हती.

ढगाळ वातावरण व वाऱयाचा अभाव यावरून परिस्थितीत कोणताच बदल होणार नाही, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे खेळाला लवकर सुरुवात होईल, ही आशाही धूसर झाली आहे. सामनाधिकारी व पंचांनी उपाहाराचा ब्रेक अर्धा तास आधीच घेण्याचा निर्णय घेतला. चहापानाच्या सुमारास वातावरणात थोडासा बदल होण्याची शक्मयता हवामान खात्याने वर्तविला आहे. या सत्रात खेळ सुरू झाल्यास शेवटच्या सत्रात जादा वेळ खेळ घेतला जाण्याची शक्मयता आहे. लॉर्ड्स मैदानावर उत्कृष्ट व अत्याधुनिक डेनेज व्यवस्था असल्याने वातावरणात सुधारणा झाल्यास खेळ लवकरात लवकर सुरू होऊ शकतो. या आठवडय़ाच्या अखेरीस व सोमवारीही पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तविली असल्याने या सामन्यात पावसाचा वारंवार अडथळा येऊ शकतो.

यजमान इंग्लंडने बुधवारी 12 जणांच्या संघाची घोषणा केली असून 20 वषीय ऑलिव्हर पोप कसोटी पदार्पणाची प्रतीक्षा करीत आहे. भारताने मात्र अंतिम संघाची घोषणा केलेली नव्हती. पण दुसरा स्पिनर खेळविण्याची इच्छा असल्याचे कर्णधार कोहलीने म्हटले होते. मात्र वातावरणाचा विचार करता कोहलीचा ही इच्छा बदलण्याची शक्मयता आहे. इंग्लंडने पहिली कसोटी 31 धावांनी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून बरोबरी साधण्यासाठी भारत या सामन्यात प्रयत्न करेल. मात्र वरुणराजाचा अडथळा येत राहणार असल्याने हा सामना पूर्ण होऊ शकेल का, अशी साशंकताही वाटते.

Related posts: