|Friday, March 22, 2019
You are here: Home » क्रिडा » रौप्यपदकासमोर टिकेला सिंधुची चपराक

रौप्यपदकासमोर टिकेला सिंधुची चपराक 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधुने नुकत्याच झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱयांदा रौप्यपदक पटकाविले. या रौप्यपदकासमोर सिंधुनी टिका करणाऱयांना चांगलीच चपराक दिली आहे. या कामगिरीबद्दल आपण समाधानी असून पुढील खेपेला आपण सुवर्णपदकासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल, अशी ग्वाही सिंधुने दिली.

विश्व बॅडमिंटन स्पर्धेतील माझा काढण्यात आलेला ड्रॉ पहिल्या फेरीपासूनच खडतर होता. तरी पण पहिल्या सामन्यापासूनच मला विजयासाठी झगडावे लागले. या स्पर्धेत आपण परिपूर्ण क्षमतेनिशी खेळ केला. यापेक्षाही मला सुवर्णपदकासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील आणि सुवर्णपदक मिळेपर्यंत मी या परिश्रमाला बिचकणार नाही, असे प्रतिपादन पी.व्ही. सिंधुने वृत्तसंस्थेशी बोलताना केले. गेल्या आठवडय़ात झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मॅरीनने सिंधुला पराभूत करून सुवर्णपदकावर आपले नावे कोरले. अलिकडच्या कालावधीत सिंधुचा अंतिम फेरीतील हा तिसरा मोठा पराभव आहे.

या पराभवानंतर आपल्याला काही जणांकडून केलेल्या टिकेला सामोरे जावे लागले पण या टीकाकारांना प्रत्युत्तर देताना सिंधुने आपण सुवर्णपदक गमाविले पण रौप्यपदक मिळविले याची आठवण करून दिली. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱयांदा रौप्यपदक मिळविले. याचा मला खरोखरच आनंद होत आहे, असेही सिंधुने म्हटले आहे. या स्पर्धेत माझ्याकडून कामगिरीत सातत्य राखता आले. या कामगिरीला चिकाटी आणि संयम याची जोड असावी लागते. तथापि अंतिम सामन्यावेळी मला जगातील असंख्य चाहत्यांकडून प्रोत्साहन मिळाले. या प्रोत्साहानाच्या जोरावर आगामी विश्व बॅडमिंटन स्पर्धेत निश्चित सुवर्णपदक मिळवेन, असा विश्वास सिधुने व्यक्त केला. या स्पर्धेत पुरस्कर्ते, समर्थक, फिजिआ आणि स्पर्धा आयोजक यांच्या सहकार्याबद्दल सिंधुने आभार मानले आहेत. टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी सिंधुच्या या कामगिरीचे कौतुक पेले आहे.

 

Related posts: