|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » क्रिडा » अमेरिकेच्या लिडेस्कायला सुवर्णपदक

अमेरिकेच्या लिडेस्कायला सुवर्णपदक 

वृत्तसंस्था /टोकियो :

जपानमध्ये सुरू असलेल्या पॅन पॅसिफिक पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अमेरिकेच्या केटी लिडेस्कायने महिलांच्या 800 मी. फ्रीस्टाईल प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमांसह सुवर्णपदक पटकाविले. त्याचप्रमाणे पुरूषांच्या 1500 मी. फ्रीस्टाईल प्रकारात अमेरिकेच्या जॉर्डन विलीमोव्हेस्कीने सुवर्णपदक घेतले. या स्पर्धेच्या इतिहासात अमेरिकेच्या लिडेस्कायने पाचव्या क्रमांकाची जलद वेळ नोंदविली आहे.

महिलांच्या 800 मी. फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात अमेरिकेच्या केटीलिडेस्कायने 8 मिनिटे 09.13 सेकंदाचा अवधी घेत यापूर्वी म्हणजे 2014 साली या स्पर्धेत स्वत:च नोंदविलेला 8 मिनिटे 11.35 सेकंदाचा विक्रम मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या ऍनेमी टिटमसने 8 मिनिटे, 17.07 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर अमेरिकेच्या ली स्मिथने 8 मिनिटे, 17.21 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक पटकाविले.

पुरूषांच्या 1500 मी. फ्रीस्टाईल प्रकारात अमेरिकेच्या जॉर्डन विलीमोव्हेस्कीने सुवर्णपदक मिळविताना 14 मिनिटे, 46.93 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या ग्रॅट हॅकेटने 2002 साली या क्रीडा प्रकारात नोंदविलेला 14 मिनिटे, 41.65 सेकंदाचा स्पर्धा विक्रम अबाधित राहिला आहे. या क्रीडा प्रकारात यावेळी अमेरिकेच्या ग्रोथने 14 मिनिटे, 48.40 सेकंदासह रौप्यपदक आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅक्लोगेलिनने 14 मिनिटे, 55.92 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक मिळविले.

Related posts: