|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापसा अर्बनला मदतीचा हात देण्यास सरकारचा नकार

म्हापसा अर्बनला मदतीचा हात देण्यास सरकारचा नकार 

प्रतिनिधी /पणजी :

धी म्हापसा अर्बन को. ऑप. बँकेच्या संचालक मंडळाने गोवा सरकारकडे बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केलेल्या मदतीच्या मागणीचा प्रस्ताव गोवा सरकारने फेटाळल्याने बँकेसमोर नव्याने यक्षप्रश्न निर्माण झाले आहेत. संचालक मंडळाने आता गोवा सरकारकडे बँक ताब्यात घ्या, अशी मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनला कर्ज वितरणास बंदी घातली आहे. बँकेने या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. बुधवार दि. 8 रोजी सुनावणी होणार होती. मात्र न्यायाधीश रजेवर असल्याने आता ही सुनावणी आणखी 15 दिवस पुढे गेलेली आहे.

सरकाने शेअर्स घेण्याचा प्रस्ताव फेटाळला

गोवा सरकारकडे बँकेने एक प्रस्ताव दिला होता. त्यानुसार गोवा सरकारने बँकेचे शेअर्स घ्यावे आणि बँकेला 25 ते 30 कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली होती. गोवा सरकारने गुरुवारी बँकेला पत्र पाठवून प्रस्ताव फेटाळून लावला आहे. बँक ताब्यात घेऊन प्रशासक नियुक्त करण्याचा प्रस्तावही फेटाळून लावला आहे. या प्रकाराने बँकेला सरकारी आधाराची जी अपेक्षा होती तिही मावळली आहे.

Related posts: