|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यातील सर्व ‘ड्रायव्हिंग स्कूल्स’ची होणार तपासणी

राज्यातील सर्व ‘ड्रायव्हिंग स्कूल्स’ची होणार तपासणी 

पणजी :

गोव्यात असलेल्या सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कुलांची तपासणी (ऑडिट) करण्याचे वाहतूक खात्याने ठरविले असून त्या कामासाठी इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या संस्थेची नेमणूक केली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून तपासणी सुरू होणार असून मोटरवाहन कायदा नियमानुसार ती स्कूल्स चालतात की नाही याची पाहणी करण्यात येणार आहे.

 गोव्यात ड्रायव्हिंग स्कूल्स मोटार वाहन कायदा नियमानुसार चालवतात की नाही यावर तपासणीच्यावेळी प्रामुख्याने भर देण्यात येणार असून त्यांची मानांकन वर्गवारी (ग्रेड) करण्यात येणार आहे.

 राज्यातील 135 ड्रायव्हिंग स्कूल्सची पाहणी

 गोव्यात मोठय़ा संख्येने असलेल्या या 135 ड्रायव्हिंग स्कूल्सची फारशी तपासणी, पहाणी होत नाही. तेथील प्रशिक्षण देणारे चालक योग्य त्या पात्रतेचे असतात की नाही तसेच त्यासाठी वापरल्या जाणाऱया चारचाकी गाडय़ा कायदा, नियमानुसार परिपूर्ण असतात का? याचाही शोध घेतला जाणार आहे.

 आयसीएटी करणार तपासणी

 गुरगाव हरियाणा येथील आयसीएटी हे केंद्र म्हणजे स्वतंत्र व स्वायत्त यंत्रणा असून ती 2006 मध्ये स्थापन झाली आहे. तेव्हापासून ड्रायव्हिंग स्कूलांची तपासणी करण्याचे काम ती करीत असून राज्य सरकारने देखील त्याच यंत्रणेकडे गोव्यातील ड्रायव्हिंग स्कुलांची तपासणी करण्याचे काम सोपवले आहे.

 गोव्यातील चारचाकी वाहनांचे वाढते अपघात आणि त्यांचे चालक यांची दखल घेऊन वाहतूक खात्याने सदर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सदर तपासणी हाती घेण्यात येणार असून त्या स्कुलांची सखोल चौकशी होणार आहे.

Related posts: