|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पालकमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त

पालकमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

    राज्याचे महसूलमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी रात्री कोल्हापूर दौऱयावर आले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी मध्यरात्रीपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थान परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून मोर्चासाठी तैनात केलेल्या बंदोबस्ताची माहिती दिली. पालकमंत्री पाटील यांनी आंदोलनाचा आढावा घेतला.

    मराठा समाजस आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी या आंदोलनास हिंसक वळण लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे आंदोलकही दुखावले आहेत. त्यांच्या भावना राज्यशासनाच्या विरोधात तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाचा निर्णय तात्काळ न घेतल्यास सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक, 30 पोलीस कर्मचारी, 1 जलद कृती दलाची तुकडी असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थाकडे जाणारे सर्व मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले होते.

Related posts: