|Sunday, February 17, 2019
You are here: Home » Top News » कर्मचाऱयांचे प्रश्न सोडवणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही-उद्धव ठाकरे

कर्मचाऱयांचे प्रश्न सोडवणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही-उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

निवडणुकीआधी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा. हे शेतकऱयांच्या बाबतीत झाले, तसे सरकारी कर्मचाऱयांच्या बाबतीतदेखील झाले. या जुमलेबाजीविरोधात आगोदर शेतकऱयांनी बंड पुकारला आणि आता सरकारी कर्मचाऱयांनी बंड केला. तुम्हाला सत्तेवर आणणारे हेच लोक आहेत. त्यांनीच आता उदेक केला आहे. हेच लोकप्रियतेचे लक्षण आहे काय? असा सवाल करत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱयांच्या मागण्या मान्य करता येणार नाहीत, यावर आमचा विश्वास नाही. तिजोरीत पैसा नसला तरी सरकार चालवणाऱयांच्या खिशात पैसा आहे व हा पैसा प्रत्येक निवडणुकीत लाटा उसळाव्या तसा बाहेर पडत असतो. जळगाव, सांगली महानगरपालिका निवडणुकीत ते पुन्हा दिसल्याची टीका शिवसेनेने अग्रलेखातून केली आहे. शेतकऱयांपासून सरकारी कर्मचाऱयांपर्यंत सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे? हासुद्धा शंकेचा विषय आहेच. शेतकरी व सरकारी कर्मचाऱयांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका साम-दाम-दंड-भेदाने जिंकण्याइतके सोपे नाही. मुख्यमंत्री व त्यांचे सरकार इतके लोकप्रिय असते तर शेतकरी व कर्मचारी संपावर गेले नसते आणि मराठा समाज रस्त्यावर उतरून हिंसक बनला नसता असा खोचक टोलाही शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

Related posts: