|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » मराठा आंदोलनावर बंदी घाला ; हायकोर्टात याचिका दाखल

मराठा आंदोलनावर बंदी घाला ; हायकोर्टात याचिका दाखल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठा आंदोलनांना लागत असलेले हिंसक वळण पाहता या आंदोलनांवर प्रतिबंध घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या नुकसानीची रक्कम आंदोलकांकडून वसूल करावी, अशी मागणी त्यात आहे.

मराठा आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे का, अशी शंका उपस्थित करत मुंबईतील ऍड. आशिष गिरी आणि द्वारकानाथ पाटील या शेतकऱयाने ही याचिका दाखल केली आहे. 13 ऑगस्ट रोजी सुनावणीची शक्मयता आहे. ऍड. आशिष गिरी म्हणाले, आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे हे सर्वांना माहीत असूनही तोडफोड केली जात आहे. काही समाजकंटक आंदोलनाचा गैरफायदा घेऊन हिंसा पसरवत आहेत का, याचा तपास करणेही गरजेचे आहे.

Related posts: